सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' प्रदान

 बीड जिल्ह्याचा मोठा बहुमान: धर्मगुरु प.पू. अमृताश्रम स्वामी महाराजांचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान


सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' प्रदान


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
महाराष्ट्र शासनाकडून  सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा बहुमानाचा 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' वितरण सोहळा नुकताच झाला.यामध्ये बीड जिल्ह्याचा मोठा बहुमान झाला असुन बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला.
           बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)नवगण राजुरीकर   यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 13-02-2024 रोजी  सुधीर मुनगंटीवार  (सांस्कृतिक कार्य मंत्रालय) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अमृत आश्रम स्वामी महाराज यांचा या समारंभात गौरव झाला.  हा एक प्रकारे बीड जिल्ह्याचा बहुमान व अभिमानास्पद क्षण आहे.
           बीड जिल्ह्यातील राजुरी नवगण येथील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तन असणारे  अमृतमहाराज जोशी (अमृताश्रम स्वामी महाराज) यांना राज्य सांस्कृतिक कीर्तन प्रबोधन हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार  सुधीर मुनगंटीवार साहेब (सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्राप्त झाला..आत्ता पर्यंत अमृतमहाराज यांना वारकरी भूषण,सिंधुदुर्ग,एकता,बापू,इत्यादी असे 48 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कलेची, कीर्तन शैलीची , समाज प्रबोधनाची, परखड विचारांची दखल घेऊन अत्यंत प्रतिष्ठित असा कीर्तन प्रबोधन पुरस्कार देउन  सन्मान केला आहे.निश्चितच हा  बीड जिल्ह्यासाठी  अभिमानास्पद सन्मान आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार