औंढानागनाथ-परळी वैजनाथ- अंबाजोगाई येणार शक्तिपीठ महामार्गावर

 'शक्तिपीठ’ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, ८०२कि.मी. राज्य सरकारने अंतिम आखणीस दिली मान्यता




मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता  ८०२ किमी लांबीचा असणार आहे.
           राज्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग यापैकीच. समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे.

‘शक्तिपीठ’ महामार्गाची चाचपणी झाली तेव्हा हा प्रकल्प समृद्धीपेक्षा अधिक लांबीचा अर्थात ७६० किमीचा असेल असे स्पष्ट झाले होते. मात्र आता एमएसआरडीसीने या महामार्गाचे संरेखन अर्थात महामार्ग कुठून आणि कसा जाईल यासंबंधीचा मार्ग निश्चित केला आहे. या संरेखनानुसार आता ‘शक्तिपीठ’ महामार्ग ७६० किमीऐवजी ८०२ किमी लांबीचा असेल. सुरुवातीला ढोबळमानाने संरेखन ठरविले जाते. मात्र प्रत्यक्षात सविस्तर संरेखन होते, तेव्हा अनेक बाबींचा विचार करून संरेखन करावे लागते. त्यानुसार केलेल्या संरेखनात महामार्ग ४३किमीने वाढला आहे. आता हे संरेखन अंतिम प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याचीही प्रतीक्षा आहे.  ‘शक्तिपीठ’चे संरेखन अंतिम झाल्याने आता ८०२ किमीचा हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा १०० किमीने मोठा असणार आहे. तर ‘शक्तिपीठ’ महामार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग असेल.
पवनारपासून प्रारंभ…

‘शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवा येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.

११ हजार हेक्टर जागेची गरज

समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूंसापदन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.

औंढानागनाथ-परळी वैजनाथ- अंबाजोगाई येणार शक्तिपीठ महामार्गावर

          महाराष्ट्र ही संताची भूमी असून थोर संतांची मोठी पंरपरा महाराष्ट्र राज्यास लाभली आहे. तसेच संतांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खुप महत्वपूर्ण योगदान आहे. संतांनी समाजात सदभावना निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. संतांनी समाजाला एकत्र आणण्याचे काम केले असून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व जनसामान्यात त्यांच्या किर्तनाच्या व अंभगाच्या माध्यमातून रुजविण्याचा वारकरी सांप्रदायाने उपक्रम राबविला आहे. तो सामाजिक उन्नतीसाठी सदैव स्फुर्तीदायक आहे. महाराष्ट्र राज्यात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य हा त्या निमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा ("महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग") करण्याचे प्रस्तावित आहे.

प्रस्तावित महामार्ग हा वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडणे प्रस्तावित आहे. सदर द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर व कोल्हापूर, तसेच अंबाजोगाई ही तिर्थक्षेत्र जोडली जाणार असून संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, औंढानागनाथ व परळी वैद्यनाथ येथील १२ ज्योर्तिलिंग पैकी दोन ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील विठ्ठल-रुखमाईचे मंदीर ही जोडले जाणार आहे. तसेच कारंजा (लाड), माहुर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औंदुबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळेही जोडली जातील. अंतीमतः महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग एकत्र जोडून गोवा राज्याशी कमीत कमी अंतराने जोडले जाईल.

यास अनुसरुन पवनार जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) आखणी अंतिम करण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !