इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल !


सहापानी चिठ्ठीत सापडली आत्महत्येची कारणं; मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येस  प्रवृत्त



परळी वैजनाथ , प्रतिनिधी...

      शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना दि.६  रोजी उघडकीस आली. परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.तसेच या आत्महत्येबाबत अनेक तर्क वितर्क व चर्चांना उधाण आले होते.आज अखेर प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान सहापानी चिठ्ठीत  आत्महत्येची कारणं सापडली आहेत.यातून मानसिक त्रासाला कंटाळून  आत्महत्येस  प्रवृत्त झाल्याचे दिसून येत आहे.यावरुन व मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रलहाद रंगनाथ सांवत यांनी दि. 06/02/2024 रोजी प्रेम पन्ना आपार्मेट मध्ये गळाफास घेवुन आत्महत्या केल्याने पो. स्टे ला आकस्मात क्र. 02/2024 नोंद करण्यात आली.  चौकशी दरम्यान मयताचे खिशात सहापानी चिट्ठी मिळून आली होती.यामध्ये आत्महत्येच्या कारणांचा उलगडा झाला असुन मयतास आरोपी प्रल्हाद काळे, बँकेचे सचिव गोविंद भरबडे, सचिन भरबडे व सोनपेठ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी मानसिक त्रास देवुन सोनपेठ बँकेकडून आलेली रक्कम 48 लाख रुपय परत करण्यास सांगुन संगणमत करुन मानसिक त्रास व धमक्या दिल्या. त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळुन मयत आत्महत्तेस प्रवृत्त झाला. याप्रकरणात मयत प्रल्हाद सावंत यांच्या  पत्नीने फिर्याद दिली. यावरुन आरोपींनी मयतास  मानसिक त्रास व धमक्या देवून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो. स्टे.परळी शहर येथे आरोपीविरुद्ध  गुरनं. 20/2024 कलम 306,506,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनी श्री. ससाणे हे करत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या