राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

 

कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते-संचालक मोहिनी केळकर


लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ दिले- कल्याण आयुक्त रविराज इळवे


परळी (प्रतिनिधी) :

 कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते, कामावर ताणतणाव कमी होण्यास मदत होते असे प्रतिपादन ग्राईंड मास्टर टुल्सच्या संचालक मोहिनी केळकर यांनी केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी तापडिया नाट्यमंदिर येथे झाले. यावेळी मोहिनी केळकर बोलत होत्या. व्यासपीठावर अतिरिक्त संचालक मानव संसाधन, लोकमत वृत्त समुहचे बालाजी मुळे, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांची उपस्थित होती.

जुन्या पिढीची कला परंपरा जपण्याचे काम कामगार  मंडळ करत आहे. संगित, नृत्यामुळे वजन नियंत्रणात राहून आरोग्य उत्तम राहते असे यावेळी लोकमत वृत्त समूहाचे अतिरिक्त संचालक बाळाजी मुळे म्हणाले. लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे. कामगार कल्याण मंडळामुळे अनेक कलावंत, खेळाडू घडले आहे असे कल्याण आयुक्त रविराज इळवे यावेळी म्हणाले. आभार कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी मानले. तर सुत्रसंचलन विजय अहिरे यांनी केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार