कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

 भाजपचं सरप्राईज पॅकेज : अशोक चव्हाणांसह नांदेडमधूनच निष्ठावंताला राज्यसभेची उमेदवारी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?



अजित गोपछडे हे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहे. याशिवाय, ते एक कारसेवकही आहेत. पेशाने डॉक्टर असलेले अजित गोपछडे हे भाजपच्या वर्तुळातही फारसे माहिती नसलेले नाव आहे.

राज्यातील सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, भाजपच्या पुण्यातील निष्ठावंत नेत्या मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार, हे जवळपास निश्चित होते. तर चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात राजकीय बस्तान बसवण्यासाठी राजकीयदृष्ट्या विस्थापित झालेल्या मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊन अखेर न्याय दिला आहे. मात्र, या सगळ्यात डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांना मिळालेली उमेदवारी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला अद्याप डॉ. अजित गोपछडे हे नाव तितकेसे परिचित नाही. मात्र, अजित गोपछडे हे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहे. याशिवाय, ते एक कारसेवकही आहेत. पेशाने डॉक्टर असलेले अजित गोपछडे हे भाजपच्या वर्तुळातही फारसे माहिती नसलेले नाव आहे. ते भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रमुख आहे. त्यांनी आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबीरं आयोजित केली आहेत. कोरोना साथीच्या काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. अगदी काल-परवापर्यंत भाजपच्या राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या शर्यतीत अजित गोपछडे यांचे नाव कुठेच नव्हते. मात्र, भाजपने शेवटच्या क्षणी सर्वांना धक्का देत अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

एकीकडे भाजपने अशोक चव्हाण यांच्या रुपाने बाहेरुन आलेल्या नेत्याला लगेच राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत आणि सामान्य केडरमध्ये नाराजी पसरण्याचा धोका होता. परंतु, त्याचवेळी मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या निष्ठावंतांना संधी देऊन भाजप नेतृत्त्वाने एकप्रकारे बॅलन्स साधला आहे. 

कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे.
 
डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. गोपछडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि. बिड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !