धनंजय मुंडेंची अर्थपुर्ण प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंची अर्थपुर्ण प्रतिक्रिया



अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आय़ोगाने दिले आहेत.

यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिशय अर्थपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया....

 घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच!

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत! या निकालातून आज आमचा निर्णय योग्यच होता हे पुन्हा एकदा नियतीने सिद्ध केले. पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन. हा विजय लोकशाहीचा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार