इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन

 वैद्यनाथ साखर कारखान्याचे माजी अधिकारी व्ही. एम. कुलकर्णी यांना मातृशोक




श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यालय अधीक्षक विष्णू माधवराव कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई कुलकर्णी पंढरपूरकर यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. बरं मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते.

    श्रीमती मालतीबाई माधवराव कुलकर्णी पंढरपूरकर या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यातच आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गोपालपाळे गल्ली येथून त्यांची अंत्ययात्रा निघून वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     श्रीमती मालतीबाई कुलकर्णी या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या असल्याने सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात  एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. कुलकर्णी परिवारावर कोसळलेल्या दु:खात  एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या