बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते  होणार उद्घाटन




परळी: प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार असून परळी तालुक्याचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे सतत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवत असतात आणि दिव्यांगासाठी घेतलेला सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा वसा ते अविरत जपत असतात.

 

त्यांच्याच प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून बीड जिल्ह्यातील ह्या पहिल्या दिव्यांगाच्या मराठवाडा  शिवभोजन केंद्राचे बरकत नगर परळी वैजनाथ येथे भव्य शुभारंभ आज होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.

  

अशा या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून परळी तालुक्यातील सामान्य आणि गरजू नागरिकांना तसेच दिव्यांगाना अतिशय पोषक व सकस आहार उपलब्ध करून देण्याचे पुण्य कार्य घडणार आहे तरी या भव्य उद्घाटन समारंभाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष व या मराठवाडा शिवभोजान केंद्राचे मालक सय्यद सुभान यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !