राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी

 राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी




      राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवाव्यात, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे शाळांना आता चौथी पर्यंतच्या वर्गाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.

सध्या महाराष्ट्रात मुलांच्या शाळेची वेळ प्राथमिक शाळा वर्ग सकाळी आणि माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरवले जातात.  महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. या गटात 3 ते 10 वर्षांचे मुले असतात.
या मुलांच्या सकाळी शाळा असंल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या साठी या मुलांच्या शाळेच्या वेळ बदलण्याच्या सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून केल्या जात होत्या. प्राथमिक वर्गच्या शाळा दुपारी आणि माध्यमिक वर्गांच्या शाळा सकाळी व्हावा.या बाबत राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली. आता प्राथमिक शाळांचे वर्ग  शाळांची वेळ सकाळी नऊ वाजे नंतरची असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार