कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती

 संसारात गुंतून न राहता निर्मोही व्यक्ती परमार्थाने सुखाची प्राप्ती करते  - हभप संजय महाराज पाचपोर




कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     ज्याप्रमाणे पक्षांचे जीवन हे कुठल्याही मोहात गुंतून न राहता समाधानाने इप्सित साध्य करण्याचे असते त्याचप्रमाणे परमार्थाने युक्त जीवन असणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही मोहाशिवाय स्वानंद  सुखाला प्राप्त होत असतात असे जीवन शेषराव (बापू)कराड यांचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी केले. इंजेगाव येथे कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त  किर्तनसेवा झाली यावेळी ते बोलत होते.कै.शेषराव कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती होती.


     "पक्षी अंगणी उतरती,ते का गुंतोनी राहती " या  शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करतांना रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले की, वारकरी संतांनी आपला प्रपंच व  परमार्थ केला आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी जगाच्या पुढे मांडला. संसाराची अचूक बैठक असल्याशिवाय आपण परमार्थात प्रवेशच करू शकत नाही. परंतु जीवन जगत असताना सगळ्यात मोठे भय प्राण्याला कोणतं असेल तर ते मृत्यूचे आहे. आणि हे भय जावं अस वाटत असेल तर अखंड भगवंतनामाचे चिंतन करावे लागेल. ज्याला मरेपर्यंत आपल्याला जगायचच आहे हे कळलं तोच या जगात भयमुक्त झाला. परंतु या मरणाचे भय जरी आपण बाळगत असलो तरी संतांनी मात्र तेच मरण आपला सोहळा केलाय. हीच वारकरी संतांनी विश्वात केलेली सर्वात मोठी क्रांती केली. जेव्हा अंगणात दाण्यांचा सडा पडलेला असतो तेव्हा आकाशात उडणारा पाखरांचा थवा ते दाने टिपण्यासाठी येतो आणि त्यांचं पोट भरेपर्यंत ते दाने टिपतात आणि पोट भरल्यावर कितीही दाने शिल्लक राहले तरी त्या मोहात न गुंतता ते आकाशात उडून जातात. असेच यथार्थ जीवन कै.शेषराव (बापू) कराड यांचे होते असे त्यांनी सांगितले.

      वैद्यनाथ बॅकेचे व्हा.चेअरमन रमेश कराड व लक्ष्मण कराड यांचे वडील कै.शेषराव (बापू) कराड यांच्या गोडजेवणानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार आर टी देशमुख, माजी आमदार गजानन घुगे  माजी आमदार गोविंद केंद्रे , माजी आमदार केशवराव आंधळे,माजी आमदार पाशा पटेल , त्रिपुराचे सचिव किरणकुमार गित्ते, जालना जि प माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, मनसेचे नेते प्रकाश महाजन, पुणे येथील एडवोकेट अविनाश आव्हाड, अकोल्याचे अजय राजूरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, स्नेही, नागरिक, भजनी मंडळ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार