परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर

 परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर



परळी वैजनाथ

धरणात पाणी असूनही चार दिवसाआड पाणी पुरवठा व जागोजागी फुटलेल्या पाईपलाईनमुळे भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे नगर परिषदेने पाईपलाईनची दुरुस्ती करून दोन दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीतच शहरातील अनेक भागातील बोर आटू लागले आहेत. 

मात्र परळी वैजनाथ नगर परिषद प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. जनतेच्या कररूपी पैश्यातून चालणारी नगर परिषद मात्र नागरिकांना होणाऱ्या त्रासाला उत्तर शोधण्यास असमर्थ आहे. परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर वाण धरणात 65 टक्के पाणी साठा आहे. हे पाणी दोन वर्षे पुरेल एवढे आहे. असे असतानाही परळी शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे असा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. परळी शहरात 4-5 दिवसाआड येणारे पाणी आता पुरे होत नाही. त्यात अनेक बोर आटून चालले आहेत. शहरात फुटलेल्या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही.

दोन दिवसाआड अर्धा तास जरी पाणी सोडले तर नागरिकांना दिलासा मिळेल. 4-5 दिवसाआड येणारे 1 तास पाणी किती आणि कुठे भरून ठेवणार? त्यापेक्षा 2 दिवसाआड अर्धा तास पाणी सोडले तर पुरेसे आहे. अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

शहरात फुटलेल्या पाईपलाईन त्वरित दुरुस्त व्हाव्यात. आझाद चौक ते वैद्यनाथ मंदिर या रोडवर, गावभागतील अंबेवेस, प्रिया नगर भगत असेच शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासक, अधिकाऱ्यांनी खुर्ची सोडून शहरात फिरून समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. अन्यथा परळीच्या नागरिकांना उन्हाळ्यात वणवण फिरावे लागेल व प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार