परळी- सिररसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस;दर्जेदार काम करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन-फुलचंद कराड

 परळी- सिररसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस; दर्जेदार काम करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन-फुलचंद कराड




परळी,(प्रतिनिधी):- परळी सिरसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत बोगस होत असून या रस्त्याचे काम दर्जेदार करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला आहे.


  या बाबत दिलेल्या निवेदनात भाजपा ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एफ परळी -सिरसाळा-तेलगाव-बीड-खरवंडी मार्गाचे कामपरळी ते सिरसाळा भागात चालू आहे. गेल्या १ वर्षापासून हे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. एका बाजूचे काम करुन एका बाजुने वाहतुक कळणे आवश्यक होते. तसे न करता संपूर्ण रोड खोदून ठेवला आहे. सेंटरला बॅरीकेटही लावलेले नाहीत. मातीने भरलेली सिमेंटची अर्धी पोती लावली आहेत. त्यामुळे अनेक अपघात होवून अनेक माणसे मृत्युमुखी पडली आहेत. धुळीचे लोटामुळे आजुबाजुच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गावात घराघरात धूळ अन्नात मिसळत आहे. रोडवर पाणी टाकल्या जात नाही. टू व्हिलर वापरणारांना गाडी चालवता येत नाही. लिंबोटा गावचे दलित वस्तीतील पाईपलाईन फुटल्यामुळे तेथील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे लिंबोटा गावचे पाणी जवळपास २ महिने बंद होते. आताही पाईप लिकेज होतात. त्यामुळे मुबलक पाणी मिळत नाही. युटीलिटीसाठी १ मीटर सोडलेल्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर कोणीही साईडवर फिरकत नाहीत. कोणाचीही तक्रार ऐकून घेतली जात नाही. वाण नदीतील पुल पाडणार आहेत. बायपास काढला आहे. त्यामध्ये फक्त भिंत उभी केली आहे. त्यामध्ये नाल्याही टाकल्या नाहीत. पाणी आले तर रस्ता व शेतकऱ्यांची शेती वाहून जाऊन कन्हेरवाडीच्या पुलासारखी दुरावस्था होईल. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना कौठळी मार्ग जावे लागत आहे. सदरील रस्त्याचे काम दर्जेदार करा अन्यथा ८ दिवसात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार