नाशिक येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी निवड

 सिंदफणा शाळेच्या नाट्य अभिवाचनाला प्रथम पारितोषिक 


नाशिक येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी निवड 


माजलगाव (प्रतिनिधी) 


 बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनामध्ये  सिंदफणा पब्लिक स्कूलच्या नाट्य विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 'दगडुला पडलेला प्रश्न ' या नाट्य अभिवाचनाला प्रथम पारितोषिक   मिळाले. याबद्दल सिंदफणा शाळेवर तसेच नाट्य विभागावार कौतुकाचा वर्षाव होत आहे.  


सविस्तर वृत्त असे की, बीड येथे दिनांक ६ व ७ फेब्रुवारी दरम्यान १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने स्थानिक कलावंताना संधी देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी नाट्य अभिवाचन स्पर्धेमध्ये सिंदफणा पब्लिक स्कूलच्या नाट्य विभागाचे संचालक सखाराम जोशी, शिक्षक प्रवीण मडके, कृष्णा नवले व ललिता सोळंके यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी विजयकुमार राख लिखित तसेच कृष्णा नवले दिग्दर्शित 'दगडूला पडलेला प्रश्न ' हे नाट्य अभिवाचन सादर केले. ग्रामीण जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या या नाट्य अभिवाचनास मान्यवर आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाट्य अभिवाचनाला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच नाशिक येथे होणाऱ्या उपांत्य फेरीतील निवड करण्यात आली. या सादरीकरणासाठी शाळेचे प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, नाट्य विभागाचे संचालक सखाराम जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 


या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, संस्थेच्या सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !