बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटनेने जिल्हा हादरला

 नात्याला काळीमा:41 वर्षीय पित्याने मुलीवर केला अत्याचार;मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उघड


धारूर, प्रतिनिधी.....

           धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील बाळू गायकवाड 41  वर्षीय  नराधमाने आपल्या पोटच्या मुलीवर दारू पिऊन , मारहाण करत अत्याचार केला त्यात मुलगी गर्भवती जाली असून या अत्याचाराची माहिती आईला दिली या  प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन येथे आरोपी बाळू गायकवाड विरुद्ध मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत

           अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे दारुड्या बापाकडून मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक ची माहिती उमराई येथे गायकवाड कुटुंब हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंब चालवते विशेष म्हणजे हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून इतरत्र कारखान्याला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असते या यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्याला हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले होते त्या ठिकाणी काम करत असताना मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिला आईला सांगितले असता तिच्या आईने तिला अंबाजोगाई येथे सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचं सांगून  मुलीला रुग्णालयातील प्रसूती वार्डामध्ये ऍडमिट होण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांच्याकडे कपडे किंवा कोणत्याच वस्तू उपलब्ध नसल्याने मुलगी आईसह ऊस तोडणीच्या ठिकाणी खोपी मध्ये रात्र काढून  दुसऱ्या दिवशी सात फेब्रुवारी बुधवार  रोजी परत रुग्णालयात येऊन प्रसूती वार्डामध्ये दाखल झाली.यावेळी अधिक चौकशी केल्यानंतर मुलीने वडिलांनीच मागील आठ महिन्याखाली राहत्या घरी आई बाहेर गेल्यानंतर दारू पिऊन अनेक वेळा मारहाण करत अत्याचार केल्याची आपबिती कथन केली यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून वडील बाळू गायकवाड यांच्या विरोधात अत्याचाराचा  गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिडीमार पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोळंके करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार