प्रा. भाग्यश्री कापरे यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्रदान

 प्रा. भाग्यश्री कापरे यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्रदान


नांदेड येथील महात्मा गांधी मिशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र अभियांत्रिकीच्या प्रा.सौ.  भाग्यश्री संतोष कुलकर्णी (कापरे ) यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेतील पीएचडी (डॉक्टरेट) मिळविली आहे.‌ त्या मुळच्या अंबाजोगाई येथील रहिवासी असून सध्या नांदेड येथे स्थायिक आहेत. त्यांनी  "डिजिटल इमेज अँड  व्हिडिओ वॉटरमार्ककिंग " या विषयांमध्ये विभागप्रमुख डॉ. अर्चना राजुरकर व नांदेडच्या एसजीजीएसआयटी मधील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. एस. एन. तलबार यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पीएचडी चा शोधप्रबंध पूर्ण केला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष आदरणीय कमलकिशोरजी कदम, महात्मा  बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरआप्पा बिडवे, एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य विष्णुपंत कुलकर्णी , डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीणजी सरदेशमुख , रामभाऊ कुलकर्णी, माणिकराव भोसले , डॉ कल्पनाताई चौसाळकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेंबर डॉ .प्रशांत पेशकार, दीपक मोरताळे,  दीनदयाळ नागरी बँकेचे अध्यक्ष ॲड. मकरंद पत्की, डॉ.गोपाळराव चौसाळकर, पत्रकार अविनाश मुडेगांवकर , प्रशांत बर्दापूरकर, सुदर्शन रापतवार, डॉ. महेश ढेले, आकाशवाणीचे वार्ताहर एम एम कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !