युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

आमचा पक्ष आणि आमचे चिन्ह,शरदचंद्र पवार -सौ.सुदामतीताई गुट्टे

 आमचा पक्ष आणि आमचे चिन्ह,शरदचंद्र पवार -सौ.सुदामतीताई गुट्टे



परळी ,प्रतिनिधी

काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीरतावादी गटाला पक्ष,आणी चिंन्ह देऊन पुन्हा एकदा लोकशाही चा गळा घोटला असुन महाराष्ट्राची सर्व सामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असुन पक्ष,चिंन्ह जरी गेले असले तरी आमचा पक्ष आणी आमचे चिन्ह शरदचंद्र पवार हेच असल्याची प्रतिक्रिया जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांनी दिली आहे.

दिल्लीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता आणि चिन्ह दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबत दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षित होता. आमचे 1999 पासून चिन्ह घड्याळ हे गेले, याचे आम्हाला दुःख आहे. शरद पवार आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, जे काही चिन्ह घेतील, ते आम्ही घराघरांमध्ये पोहोचवू म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते शरद पवार यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेले तरी शरद पवार आमच्याकडे आहेत,  विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे तेच हेच आमचे चिन्ह आणि तेच आमचा पक्ष मानून आम्ही ही लढाई लढू,असेही जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे सांगतिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या