पोस्ट्स

श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याचे माजी अधिकारी  व्ही. एम. कुलकर्णी यांना मातृशोक श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यालय अधीक्षक विष्णू माधवराव कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई कुलकर्णी पंढरपूरकर यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. बरं मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते.     श्रीमती मालतीबाई माधवराव कुलकर्णी पंढरपूरकर या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यातच आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गोपालपाळे गल्ली येथून त्यांची अंत्ययात्रा निघून वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      श्रीमती मालतीबाई कुलकर्णी या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या असल्याने सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात  एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. कुलकर्णी परिवारावर कोसळलेल्या दु:खात  एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

इमेज
  भाजपचं सरप्राईज पॅकेज : अशोक चव्हाणांसह नांदेडमधूनच निष्ठावंताला राज्यसभेची उमेदवारी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे? अजित गोपछडे हे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहे. याशिवाय, ते एक कारसेवकही आहेत. पेशाने डॉक्टर असलेले अजित गोपछडे हे भाजपच्या वर्तुळातही फारसे माहिती नसलेले नाव आहे. राज्यातील सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, भाजपच्या पुण्यातील निष्ठावंत नेत्या मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार, हे जवळपास निश्चित होते. तर चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात राजकीय बस्तान बसवण्यासाठी राजकीयदृष्ट्या विस्थापित झालेल्या मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊन अखेर न्याय दिला आहे. मात्र, या सगळ्यात डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांना मिळालेली उमेदवारी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला अद्याप डॉ. अजित गोपछडे हे नाव तितकेसे परिचित नाही.

सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' प्रदान

इमेज
  बीड जिल्ह्याचा मोठा बहुमान: धर्मगुरु प.पू. अमृताश्रम स्वामी महाराजांचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' प्रदान परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... महाराष्ट्र शासनाकडून  सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा बहुमानाचा 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' वितरण सोहळा नुकताच झाला.यामध्ये बीड जिल्ह्याचा मोठा बहुमान झाला असुन बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते   सन्मान करण्यात आला.            बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)नवगण राजुरीकर   यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 13-02-2024 रोजी  सुधीर मुनगंटीवार  (सांस्कृतिक कार्य मंत्रालय) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अमृत आश्र

वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरानी संधीत रूपांतर करावे - कृषिमंत्री धनंजय मुंडे

इमेज
  वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरानी संधीत रूपांतर करावे - कृषिमंत्री धनंजय मुंडे मुंबई दि. 14 फेब्रुवारी - आजच्या शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवीधर घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.  डॉ पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.  ते म्हणाले की, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनाचे काम संपले असले तरी वास्तविक जीवनात त्यांची खरी परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. भारत सरकारने नुकतेच एम. एस. स्वामीनाथन यांना नुकतेच मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले आहे. कै स्वामीनाथन यांनी वेगवेगळ्या वाणांचे संशोधन करून देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवली व देशासमोरील अन्नधान्याचे संकट दूर केले. त्यांची प्रेरणा घेऊन काम केल्यास तुमच्यातूनच एखादा स्वामीनाथन तयार होऊन देशासमोरील मोठ्य

महिलांची लक्षणिय उपस्थिती; वीरशैव समाजाचा उपक्रम; महाप्रसादाने सांगता

इमेज
 संत शिरोमणी श्री  मन्मथ स्वामी जन्मोत्सव जल्लोषात साजरा श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांचे आशिर्वचन महिलांची लक्षणिय उपस्थिती; वीरशैव समाजाचा उपक्रम; महाप्रसादाने सांगता परळी वैजनाथ /संतोष जुजगर येथील श्री  गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) मध्ये विरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव आज बुधवार दिनांक 14 फेबु्वारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी श्री जगमित्र नागा मंदिर येथून श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांची श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पूजा व महाआरती केली. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी पाळना म्हणला व पुजा केली.यावेळी श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांची प्रमुख उपस्थिती होती. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींचा जन्मोत्सवानंत

परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर

इमेज
  परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर परळी वैजनाथ धरणात पाणी असूनही चार दिवसाआड पाणी पुरवठा व जागोजागी फुटलेल्या पाईपलाईनमुळे भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे नगर परिषदेने पाईपलाईनची दुरुस्ती करून दोन दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीतच शहरातील अनेक भागातील बोर आटू लागले आहेत.  मात्र परळी वैजनाथ नगर परिषद प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. जनतेच्या कररूपी पैश्यातून चालणारी नगर परिषद मात्र नागरिकांना होणाऱ्या त्रासाला उत्तर शोधण्यास असमर्थ आहे. परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर वाण धरणात 65 टक्के पाणी साठा आहे. हे पाणी दोन वर्षे पुरेल एवढे आहे. असे असतानाही परळी शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे असा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. परळी शहरात 4-5 दिवसाआड येणारे पाणी आता पुरे होत नाही. त्यात अनेक बोर आटून चालले आहेत. शहरात फुटलेल्या पाईपलाईन मध

नाशिक येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी निवड

इमेज
  सिंदफणा शाळेच्या नाट्य अभिवाचनाला प्रथम पारितोषिक  नाशिक येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी निवड  माजलगाव (प्रतिनिधी)   बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनामध्ये  सिंदफणा पब्लिक स्कूलच्या नाट्य विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 'दगडुला पडलेला प्रश्न ' या नाट्य अभिवाचनाला प्रथम पारितोषिक   मिळाले. याबद्दल सिंदफणा शाळेवर तसेच नाट्य विभागावार कौतुकाचा वर्षाव होत आहे.   सविस्तर वृत्त असे की, बीड येथे दिनांक ६ व ७ फेब्रुवारी दरम्यान १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने स्थानिक कलावंताना संधी देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी नाट्य अभिवाचन स्पर्धेमध्ये सिंदफणा पब्लिक स्कूलच्या नाट्य विभागाचे संचालक सखाराम जोशी, शिक्षक प्रवीण मडके, कृष्णा नवले व ललिता सोळंके यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी विजयकुमार राख लिखित तसेच कृष्णा नवले दिग्दर्शित 'दगडूला पडलेला प्रश्न ' हे नाट्य अभिवाचन सादर केले. ग्रामीण जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या या नाट्य अभिवाचनास मान्यवर आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाट्य

पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय

इमेज
  पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय *मुंबई दि 13 फेब्रुवारी 2024-* पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पिक विम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पिक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भ

वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन

इमेज
  वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन  रासेयेतून सामाजिक जबाबदारीचे जाणिव होते - प्रा . डॉ . संजय खडप थोर व्यक्तींचे संस्कार आत्मसाथ करण्यासाठी एन . एस.एस. - प्रा . डॉ . मकरंद जोगदंड परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  दि . ८ ते १४ फेब्रुवारी  २०२४ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ . रमेश राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले . यासात दिवशीय शिबिरात समाजिक प्रबोधन सह विशेष जलसंवर्धनासाठी पाझर तळे निर्मिती पाणी अडवा पाणी जिरवा - श्रमदान, आधार काटीचा संवाद जेष्ठांशी, महिला मेळावा - बालविवाह प्रथा निर्मूलन आणि प्रतिबंध कायदा जनजागरण, स्वच्छता आभियान उपक्रम राबविण्यात येणार आहेत . शिबिराच्या उद्धाटन संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक म्हणुन  सामाजिक जाणिवेच प्रबोधन करणारे कवी डॉ . संजय खडप, प्रा . डॉ . मकरंद जोगदंड ,प्राचार्य अरूण पवार, सरपंच सौ शाहुताई विजय राठोड,  रा. से . यो. चे प्रा
इमेज
  पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल ! सहापानी चिठ्ठीत सापडली आत्महत्येची कारणं; मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येस  प्रवृत्त परळी वैजनाथ , प्रतिनिधी...       शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना दि.६  रोजी उघडकीस आली. परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.तसेच या आत्महत्येबाबत अनेक तर्क वितर्क व चर्चांना उधाण आले होते.आज अखेर प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान सहापानी चिठ्ठीत  आत्महत्येची कारणं सापडली आहेत.यातून मानसिक त्रासाला कंटाळून  आत्महत्येस  प्रवृत्त झाल्याचे दिसून येत आहे.यावरुन व मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रलहाद रंगनाथ सांवत यांनी दि. 06/02/2024 रोजी प्रेम पन्ना आपार्मेट मध्ये गळाफास घेवुन आत्महत्या केल्याने पो. स्टे ला आकस्मात क्र. 02/2024

कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती

इमेज
  संसारात गुंतून न राहता निर्मोही व्यक्ती परमार्थाने सुखाची प्राप्ती करते  - हभप संजय महाराज पाचपोर कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      ज्याप्रमाणे पक्षांचे जीवन हे कुठल्याही मोहात गुंतून न राहता समाधानाने इप्सित साध्य करण्याचे असते त्याचप्रमाणे परमार्थाने युक्त जीवन असणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही मोहाशिवाय स्वानंद  सुखाला प्राप्त होत असतात असे जीवन शेषराव (बापू)कराड यांचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी केले. इंजेगाव येथे कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त  किर्तनसेवा झाली यावेळी ते बोलत होते.कै.शेषराव कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती होती.      "पक्षी अंगणी उतरती,ते का गुंतोनी राहती " या  शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करतांना रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले की, वारकरी संतांनी आपला प्रपंच व  परमार्थ केला आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी जगाच्या पुढे मांडला. संसाराची अचूक बैठक असल्याशिवाय आपण परमार्थात प्रवेशच करू शकत नाही. परंतु ज

प्रा. भाग्यश्री कापरे यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्रदान

इमेज
 प्रा. भाग्यश्री कापरे यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्रदान नांदेड येथील महात्मा गांधी मिशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र अभियांत्रिकीच्या प्रा.सौ.  भाग्यश्री संतोष कुलकर्णी (कापरे ) यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेतील पीएचडी (डॉक्टरेट) मिळविली आहे.‌ त्या मुळच्या अंबाजोगाई येथील रहिवासी असून सध्या नांदेड येथे स्थायिक आहेत. त्यांनी  "डिजिटल इमेज अँड  व्हिडिओ वॉटरमार्ककिंग " या विषयांमध्ये विभागप्रमुख डॉ. अर्चना राजुरकर व नांदेडच्या एसजीजीएसआयटी मधील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. एस. एन. तलबार यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पीएचडी चा शोधप्रबंध पूर्ण केला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष आदरणीय कमलकिशोरजी कदम, महात्मा  बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरआप्पा बिडवे, एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य विष्णुपं

मोदींमुळे देशात 'रामराज्य' !

इमेज
  श्रीक्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी पंकजाताई मुंडे यांचं जोरदार स्वागत तुमचं दुःख हे माझं दुःख ; तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढत राहील गांव चलो अभियानांतर्गत पौंडूळ ग्रामस्थांशी साधला संवाद गोरगरिबांसाठी विविध योजना राबवून पंतप्रधान मोदींनी देशात रामराज्य आणलं बीड ।दिनांक १२। जात पात धर्म न बाळगता  वंचितांच्या सेवेचा आणि  कल्याणाचा एक संकल्प घेऊन मी राजकारणात आलेले आहे, तुमचं दुःख हे माझं दुःख आहे, तुमच्या सर्व वेदना माझ्या पदरात टाका,  तुम्हाला सर्व सुखं मिळावीत, यासाठी मी आयुष्यभर लढत राहील,नगद नारायणाने आशीर्वादरूपी एवढी शक्ती मला द्यावी अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.   भाजपच्या गांव चलो अभियानांतर्गत पंकजाताई मुंडे यांनी रविवारी रात्री श्रीक्षेत्र नारायण गडाच्या पायथ्याशी असलेल्या पौंडूळ गावात जाऊन ग्रामस्थांशी हितगूज साधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देऊन 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी ग्रामस्थांनी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान

इमेज
  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी मुंबईत धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान होणार आहे.            बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)नवगण राजुरीकर   यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 13-02-2024 रोजी मुख्यमंत्री श्रीएकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार व  सुधीर मुनगंटीवार  (सांस्कृतिक कार्य मंत्रालय) यांच्या हस्ते दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अमृत आश्रम स्वामी महाराज यांचा यास समारंभात गौरव होणार आहे या पुरस्कारासाठी श्री महाराजांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

इमेज
  ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        शहरातील एका ज्युस सेंटरमध्ये आलेल्या  ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त झाले.या ज्युस सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका युवकाने या मुलींचा व्हिडिओ फोटो घेण्याचे हे ग्रहणास्पद हे कृत्य केल्याने मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.दरम्यान मध्यवर्ती ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाली होती.        प्राप्त माहितीनुसार, परळीतील उपजिल्हा रुग्णालयाजवळ मुख्य रस्त्यावरच असलेल्या लोकमान्य ज्युस सेंटरमध्ये दोन युवती बसलेल्या असताना याच ज्युस सेंटरमध्ये काम करणारा एक युवक वारंवार त्यांच्या टेबलजवळून मोबाईल हातात धरुन ये-जा करत होता. ही बाब एका मुलीच्या लक्षात आल्याने तिने आपल्या पालकांना ही बाब कळवली.पालकांनी  येउन शहानिशा केली असता  या ज्यूस सेंटर मध्ये काम करणाऱ्य  मुलाने या   युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट केल्याचा प्रकार समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली.काही वेळातच या घटनेने नागरिक संतप्त झाल्याने

स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम

इमेज
  महाराष्ट्र विद्यालयाचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम परळी / प्रतिनिधी ग्रामीण भागातील उपक्रमशील, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) घवघवीत यश संपादन करत शाळेतील 4 विद्यार्थी या परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये पार पडली. या परीक्षेत विद्यालयातील एकोणतीस विद्यार्थी सहभागी झालेले होते या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यालयातील 4 विद्यार्थी उत्तीर्ण होत शिष्यवृत्ती करिता पात्र झाले आहेत. ही परीक्षा भारत सरकार तर्फे आयोजित केली जाते. या परीक्षेत जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतात त्यांना वर्षाला बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात 60 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील कु.अमृता दत्ता शिंदे, चि.सलगर वरद बाबुराव, चि.विश्वजित दत्तात

राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

इमेज
  कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते-संचालक मोहिनी केळकर लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ दिले- कल्याण आयुक्त रविराज इळवे परळी (प्रतिनिधी) :  कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते, कामावर ताणतणाव कमी होण्यास मदत होते असे प्रतिपादन ग्राईंड मास्टर टुल्सच्या संचालक मोहिनी केळकर यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी तापडिया नाट्यमंदिर येथे झाले. यावेळी मोहिनी केळकर बोलत होत्या. व्यासपीठावर अतिरिक्त संचालक मानव संसाधन, लोकमत वृत्त समुहचे बालाजी मुळे, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांची उपस्थित होती. जुन्या पिढीची कला परंपरा जपण्याचे काम कामगार  मंडळ करत आहे. संगित, नृत्यामुळे वजन नियंत्रणात राहून आरोग्य उत्तम राहते असे यावेळी लोकमत वृत्त समूहाचे अतिरिक्त संचालक बाळाजी मुळे म्हणाले. लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे. कामगार कल्याण मंडळामुळे अनेक कलावंत, खेळाडू घडले आहे असे कल्याण आयुक्त रविराज

बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

इमेज
  बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते  होणार उद्घाटन परळी: प्रतिनिधी   बीड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार असून परळी तालुक्याचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे सतत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवत असतात आणि दिव्यांगासाठी घेतलेला सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा वसा ते अविरत जपत असतात.   त्यांच्याच प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून बीड जिल्ह्यातील ह्या पहिल्या दिव्यांगाच्या मराठवाडा  शिवभोजन केंद्राचे बरकत नगर परळी वैजनाथ येथे भव्य शुभारंभ आज होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.    अशा या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून परळी तालुक्यातील सामान्य आणि गरजू नागरिकांना तसेच दिव्यांगाना अतिशय पोषक व सकस आहार उपलब्ध करून देण्याचे पुण्य कार्य घडणार आहे तरी या भव्य उद्घाटन

क्रिकेट क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करणार - पार्थ हिबाने

इमेज
  शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अंबाजोगाई च्या पार्थ हिबाने याची निवड;पार्थची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब - प्रदीप खाडे अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-      शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अंबाजोगाई येथील पार्थ संजय हिबाने  याची 14 वर्षाखालील गटामधून निवड झाली आहे. पार्थ याची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा कै.रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले. पार्थची निवड झाल्याबद्दल प्रदीप खाडे यांच्या निवासस्थानी आज कौटुंबिक सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.      क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय सोलापूर व शिवरत्न स्कूल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ते 5 जानेवारी अकलूज येथे निवड शिबिर घेण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून पार्थ संजय हिबाने निवड झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागातून 57 विद्यार्थी येथे खेळण्यासाठी आले होते. छत्रपती संभाजी नगर विभागातून  पाच खेळाडू या शिबिरात सहभागी झाले होते. त्यामधून पार्थ संजय हिबाने याची निवड झाली आहे. पा

राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी

इमेज
  राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी       राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवाव्यात, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे शाळांना आता चौथी पर्यंतच्या वर्गाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात मुलांच्या शाळेची वेळ प्राथमिक शाळा वर्ग सकाळी आणि माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरवले जातात.  महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. या गटात 3 ते 10 वर्षांचे मुले असतात. या मुलांच्या सकाळी शाळा असंल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या साठी या मुलांच्या शाळेच्या वेळ बदलण्याच्या सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून केल्या जात होत्या. प्राथमिक वर्गच्या शाळा दुपारी आणि माध्यमिक वर्गांच्या शाळा सकाळी व्हावा.या बाबत राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली. आता प्राथमिक शाळांचे वर्ग  शाळांची वेळ सकाळी नऊ वाजे नंतरची असणार आहे.

बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटनेने जिल्हा हादरला

इमेज
  नात्याला काळीमा:41 वर्षीय पित्याने मुलीवर केला अत्याचार;मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उघड धारूर, प्रतिनिधी.....            धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील बाळू गायकवाड 41  वर्षीय  नराधमाने आपल्या पोटच्या मुलीवर दारू पिऊन , मारहाण करत अत्याचार केला त्यात मुलगी गर्भवती जाली असून या अत्याचाराची माहिती आईला दिली या  प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन येथे आरोपी बाळू गायकवाड विरुद्ध मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत            अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे दारुड्या बापाकडून मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक ची माहिती उमराई येथे गायकवाड कुटुंब हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंब चालवते विशेष म्हणजे हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून इतरत्र कारखान्याला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असते या यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्याला हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले होते त्या ठिकाणी काम करत असताना मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिला आईला सांगितले असता तिच्या आईने तिला अंबाजोगाई येथे सहा फेब्रुवारी मं

औंढानागनाथ-परळी वैजनाथ- अंबाजोगाई येणार शक्तिपीठ महामार्गावर

इमेज
  'शक्तिपीठ’ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, ८०२कि.मी. राज्य सरकारने अंतिम आखणीस दिली मान्यता मुंबई :  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता  ८०२ किमी लांबीचा असणार आहे.            राज्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग यापैकीच. समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देण

आमचा पक्ष आणि आमचे चिन्ह,शरदचंद्र पवार -सौ.सुदामतीताई गुट्टे

इमेज
  आमचा पक्ष आणि आमचे चिन्ह,शरदचंद्र पवार -सौ.सुदामतीताई गुट्टे परळी ,प्रतिनिधी काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीरतावादी गटाला पक्ष,आणी चिंन्ह देऊन पुन्हा एकदा लोकशाही चा गळा घोटला असुन महाराष्ट्राची सर्व सामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असुन पक्ष,चिंन्ह जरी गेले असले तरी आमचा पक्ष आणी आमचे चिन्ह शरदचंद्र पवार हेच असल्याची प्रतिक्रिया जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांनी दिली आहे. दिल्लीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता आणि चिन्ह दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबत दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षित होता. आमचे 1999 पासून चिन्ह घड्याळ हे गेले, याचे आम्हाला दुःख आहे. शरद पवार आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, जे काही चिन्ह घेतील, ते आम्ही घराघरांमध्ये पोहोचवू म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते शरद पवार यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेले तरी शरद पवार आमच्याकडे आहेत,  विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे तेच हेच आमचे चिन्ह आणि तेच आमचा पक्ष म

परळी- सिररसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस;दर्जेदार काम करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन-फुलचंद कराड

इमेज
  परळी- सिररसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस; दर्जेदार काम करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन-फुलचंद कराड परळी,(प्रतिनिधी):- परळी सिरसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत बोगस होत असून या रस्त्याचे काम दर्जेदार करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला आहे.   या बाबत दिलेल्या निवेदनात भाजपा ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एफ परळी -सिरसाळा-तेलगाव-बीड-खरवंडी मार्गाचे कामपरळी ते सिरसाळा भागात चालू आहे. गेल्या १ वर्षापासून हे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. एका बाजूचे काम करुन एका बाजुने वाहतुक कळणे आवश्यक होते. तसे न करता संपूर्ण रोड खोदून ठेवला आहे. सेंटरला बॅरीकेटही लावलेले नाहीत. मातीने भरलेली सिमेंटची अर्धी पोती लावली आहेत. त्यामुळे अनेक अपघात होवून अनेक माणसे मृत्युमुखी पडली आहेत. धुळीचे लोटामुळे आजुबाजुच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गावात घराघरात धूळ अन्नात मिसळत आहे. रोडवर पाणी टाकल्या जात नाही. टू व्हिलर वापरणारांना गाड

धनंजय मुंडेंची अर्थपुर्ण प्रतिक्रिया

इमेज
धनंजय मुंडेंची अर्थपुर्ण प्रतिक्रिया अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आय़ोगाने दिले आहेत. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिशय अर्थपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ● धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया....   घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत! या निकालातून आज आमचा निर्णय योग्यच होता हे पुन्हा एकदा नियतीने सिद्ध केले. पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन. हा विजय लोकशाहीचा.