पोस्ट्स

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहात

इमेज
  शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहात परळी,( प्रतिनिधी):- हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात परळी शिवसेना युवासेनेच्या वतीने संपन्न झाली,याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तींचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने लवकरच सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात  आले. शिवसेना परळी तालुकाप्रमुख शिवाजी जिजा शिंदे,उपजिल्हाप्रमुख अँड रामराव माने,विधानसभा जेष्ठ नेते धनंजय गित्ते साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख बालासाहेब देशमुख,युवासेना तालुकाप्रमुख सोमेश्वर गित्ते,युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ,युवा नेते सचिन स्वामी,युवासेना विधान सभा प्रमुख दिपक जोशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया आनंददायी वातावरणात संपन्न झाली,यावेळी बोलतांना शिवसेनेचे नेते तथा शिवसेना शिवजयंती उत्सव समितीचे सचिन स्वामी यांनी  शिव जयंतीनिमित्त सर्वरोग निदान महा शिबिराविषयी सखोल माहिती दिली, व येणा

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

इमेज
  शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज कल्याणकारी राजे होते- प्रा प्रसाद देशमुख लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी परळी वैजनाथ दि.१९ (बातमीदार)         शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज कल्याणकारी राजे होते असे प्रतिपादन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांनी केले. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.                  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा प्रसाद देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते, स्वराज्याची स्थापना करुन जनतेचे कल्याण करणारे राजे होते. यावेळी गौरी पुजारी या विद्यार्थिनीने छत्रपती

महाराष्ट्र विद्यालय संकुलात शिवजयंती मोठया उत्साहात

इमेज
  महाराष्ट्र विद्यालय संकुलात शिवजयंती मोठया उत्साहात  परळी / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र विद्यालय संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या प्रसंगी संकुलाचे प्राचार्य विनायक राजमाने, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे,पर्यवेक्षक सुरेंद्र हरदास यांच्यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मुरलीधर बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य विनायक राजमाने यांनी करत शिव छत्रपतींना  रयतेचे राजा का म्हटले जाते हे विषद केले.यावेळी उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त करत भाषणे केली.

पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' कार्यशाळा यशस्वी

इमेज
पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  2020' कार्यशाळा यशस्वी                     सिरसाळा : (प्रतिनिधी )  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व येथील श्री. पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मराठी विभागाच्या संयुक्त विध्यमाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा दि.१७/०२/२०२४, शनिवार रोजी संपन्न झाली.या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणुन . व्यंकटराव कदम साहेब (अध्यक्ष. रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनपेठ.) उदघाटक म्हणुन डॉ.संजय शिंदे (जनसंपर्क जनसंपर्क अधिकारी .डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.) तर बीजभाषक म्हणुन प्रोफेसर.डॉ. रोहिदास नितोंडे (उप प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी )  यांच्यासह संस्था सचिव मा, श्री. योगेश कदम साहेब, महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रोफेसर डॉ. के. के. पाटील,कार्यशाळेचे समन्वयक प्रोफेसर. डॉ. एम. बी. धोंडगे (अधिसभा सदस्य, डॉ. बा. आं. म. वि. छ. संभाजीनगर.),नॅक समन्वयक डॉ. ए. व्ही. जाधव, आय.क्यू ए. सी. समन्वयक, डॉ.विक्रम ध

न्यायमूर्ती देबडवार यांची परळी वकील संघाला सदिच्छा भेट

इमेज
  न्यायमूर्ती देबडवार यांची परळी वकील संघाला सदिच्छा भेट  परळी वैजनाथ परळी येथे न्यायाधीश म्हणून काम केलेले आपल्या कर्तृत्वाने उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदापर्यंत मजल मारलेले न्यायमूर्ती बी यु देबडवार यांनी परळी वकील संघाला आज भेट दिली व परळी येथील जुन्या आठवणींना उजाळा दिला. येथील जेष्ठ विधीज्ञ यांची आवर्जून विचारपूस केली व नवीन वकिलांना मार्गदर्शन केले व कठोर परिश्रम घेण्यास सांगितले.न्यायमुर्ती देबडवार हे परळी येथे सन 1995 ते 1998 या काळात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून कार्यरत होते त्यानंतर बढती मिळवून जिल्हा व सत्र न्यायाधीश ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवावृत्त झाले. परळी वकील संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी परळी येथील न्या. एस.बी.गणाप्पा न्या.डि.आर.बोर्डे न्या.डि.व्ही.गायकवाड  परळी वकील संघाचे अध्यक्ष श्री. प्रदीप गिराम उपाध्यक्ष अँड महारुद्र कराड सचिव अँड एस आर शेख अँड.जेष्ठ विधीज्ञ हरिभाऊ गुट्टे  ऍड वसंतराव फड अँड आर व्हि गित्ते अँड जीवनराव देशमुख अँड.प्रकाश मराठे अँड एम जी मिर्झा अँड डि एल उजगरे अँड राजेश नागपुरकर अँड विलास बडे अँड उषा दौंड अँड दत्तात

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
दुःखद वार्ता:  संतोष फड यांचे निधन परळी (प्रतिनिधी):- शहरातील कपड्याचे व्यापारी व कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले संतोष गणपतराव फड वय (35) वर्ष यांचे दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वा. हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.  त्यांच्या या निधनामुळे  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ,  दोन मुली व मोठा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राख सावडण्याचा विधी आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता राख सावडण्याचा विधी कनेरवाडी येथील स्मशानभूमीत होणार आहे. फड परिवारावर कोसळलेल्या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण.....

इमेज
  औरंगाबाद -हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस उशिरा सुटणार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... बदनापूर करमाड दरम्यान आठवड्यातून दोन दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे, यामुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून उशिरा सुटणार आहे.      गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस औरंगाबाद येथून दिनांक 17, 20, 24 आणि 27 फेब्रुवारी, तसेच दिनांक 2, 5 आणि 9 मार्च, 2024 रोजी तिची नियमित वेळ दुपारी 16.15 वाजता सुटण्या ऐवजी दोन तास उशिरा म्हणजे सायंकाळी 18.15 वाजता सुटेल.प्रवाशांनी  याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.        

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

इमेज
 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर :राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम विजयकुमार यादव, डॉ. प्रदीप महाजन, धर्मवीर भारती, राणा सूर्यवंशी, राहुल पापळ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश मुंबई (प्रतिनिधी) :  राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत, पत्रकार हितासाठी आग्रही असणाऱ्या पाच व्यक्तींना महाराष्ट्र राज्य सरकार, व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार  देण्यात येत आहेत. समाजसेवा, पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींबाबत राज्यातून नागरिक, पत्रकारांकडून ३५२ प्रस्ताव आले होते. ज्यातून पाच व्यक्तींची निवड करण्यात आली, अशी माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांनी आज दिली. ज्येष्ठ समाजसेवक पोपटराव पवार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, इतिहास तज्ज्ञ डॉ. शिवरत्न शेटे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील हे पाच जण निवड समितीमध्ये होते. विजयकुमार यादव प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक. धर्मवीर भारती प्रसिद्ध अभियंता, सामाजिक कार्यकर्ते. डॉ. प्रदीप महाजन विचारवंत, आरोग्य

डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरा

इमेज
  खा.डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरा वंचित, शोषित, निराधार व दिव्यांगांसाठी सुरू केलेला सेवा यज्ञ अहोरात्र सुरू राहण्यासाठी प्रितमताई यांना दिर्घ आयुष्य लाभो -राजेश गित्ते  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे बेलंबा तालुका परळी वैजनाथ येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना वैधनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली की प्रत्येकी वर्षी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशानुसार सेवा भाव ठेवून वाढदिवस साजरा करण्यात येतो.या ही वर्षी आपण बेलंबा येथे हा कार्यक्रम घेत आहोत.लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर देणार

इमेज
  बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा होणार-राजेश गित्ते  जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर देणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रति वर्षी प्रमाणे या ही वर्षी विविध सामाजिक उपक्रम आणि जागृत देवस्थान येथे अभिषेक करून प्रितमताई मुंडे यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.     परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे बेलंबा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वाटर फिल्टर बसवण्यात येणार आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील  जागृत देवस्थान केदारेश्वर (वैजवाडी), काळभैरवनाथ (मांडवा), दत्तगुरु (दादाहारी वडगांव)बेलेश्वर भगवान (बेलंबा) मंदिरात अभिषेक व पुजा करुन प्रितमताई मुंडे यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.   वरील सर्व कार्यक्रम मा पंचायत

जिनिंगला आग;१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक

इमेज
  जिनिंगला आग;१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक माजलगाव शहरा जवळ आसलेल्या फुले पिंपळगाव येथील कुणाल कापुस जिनिंगला मशिन मध्ये फायर झाल्याने लागलेल्या आगीत१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना दुपारी ४वाजता  आग आटोक्यात आण्यास केवळ माजलगाव च्या अग्निशमन शिवाय कुठलीही मदत मिळाली नसल्याने आग आटोक्यात आनन्यास अपयश आले      माजलगाव शहरा जवळ असलेल्या पिंपळगाव शिवारात प्रवीण अग्रवाल यांच्या कुणाल कापूस जिनिंगला दि.१६ रोजी दुपारी चार वाजता मशीन मध्ये झालेल्या स्पार्कने फायर होऊन जिनिंग मध्ये असलेल्या कापसाला आग लागली. या आगीने खूप मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केल्याने जिनिंग मध्ये असलेला जवळपास 15000 कुंटल कापूस जळून खाक झाला यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली.   ही आग आटोक्यात आणण्यासाठी जिनिंगमध्ये असलेल्या वाटर सप्लायने आग आटोक्यात आणण्यासाठी. त्यासाठी माजलगाव नगरपरिषदेच्या अग्निशामन दलाच्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात असताना एका गाडीलाही आगवी देण्यात आदेश आले तोपर्यंत जुनी मधील सर्व कापसाला आग लागली होती. बाजार समितीचे सच

◆माकपची परळी तहसील कार्यालय समोर जोरदार निदर्शने

इमेज
 ◆ माकपची परळी तहसील कार्यालय समोर जोरदार निदर्शने परळी/प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी एमएसपी चा कायदा लागु करावा व आशा व गटप्रवर्तांकांना जाहीर केलेला मानधन वाढीचा जीआर लागु करावा या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी तहसील कार्यालया समोर शुक्रवारी (ता.१६) तीव्र निदर्शने करण्यात आली.             किसान मोर्चाच्या वतीने दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रामीण भारत बंद व संपाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता.१६) माकप च्या वतीने परळी तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना सर्वसमावेशक उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा मिळुन किमान आधारभूत किंमतीचे (एमएसपी) देण्याचे दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पुर्ण करावे, आशा व गटप्रवर्तांकांच्या वाढीव मानधनाचा जी आर काढुन तात्काळ अंमलबजावणी करावी, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा उपकार्यालय परळीत सुरू करावे, दलीत आदिवासी यासारखे उपेक्षित समुदाय आणि महिला शेतकऱ्यांच्या जमिनींच्या हक्काचे संरक्षण करा, गायरान जमिनी
इमेज
  संत सेवाभाया हे मानवतावादी संत -विठ्ठल चव्हाण संत सेवालाल यांची जयंती मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या उपस्थितीत साजरी परळी /भगवान साकसमुद्रे  राष्ट्रसंत सेवाभाया महाराज हे मानवतावादी संत असून त्यांच्या अनुयायांनी मानवी हक्क अधिकारांचे संवर्धन करण्यासाठी संघर्ष करावा असे प्रतिपादन गोर सेनेचे नेते अमरावती विभाग  उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण  यांनी केले संत सेवाभाया यांच्या २८५व्या जयंतीनिमित्त परळी येथील शक्तीकूंज वसाहतीतील श्रीराम मंदिर येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड, तर प्रमुख पाहुणे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये , उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, राजीव  रेड्डी, उदार,कल्याण अधिकारी शरद राठोड ,सुशील राठोड ,कुंदन राठोड, सुरक्षा अधिकारी बी आर अंबाड, कुलकर्णी,बालाजी  पवार, सेवानिवृत्त वि. के पवार आदी प्रमुख उपस्थिती होती विठ्ठल चव्हाण पुढे म्हणाले की, संत सेवाभायांनी निसर्गाचा तसेच पशुसंवर्धनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संदर्भ लावला.मानवी हक्क अधिकारांचे साठी संघर्ष करावा. वर्

वैद्यनाथ भूषण जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी

इमेज
  २५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद : वैद्यनाथ भूषण जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार जाहीर  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          परळी वैजनाथ येथे २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेत राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव होणार आहे.        समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान होणार आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परळी वैजनाथ पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा वैद्यनाथ भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.तर पौरोहित्य वर्गवारीत ब्रह्मश्री, महिला वर्गवारीत राज्यस्तरीय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींचा बह्मभूषण मनस्वीनी पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. विविध कला, क्रीडा, कथा,कीर्तन, प्रबोधन, शिक्षण, माहिती प्रसारण,संस्कृती रक्षण या वर्गवारीत ब्रह्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत. विविध संघटनात्मक काम करून ब्राह्मण संघटन मजबूत करणाऱ्या संघटना प्रमुखांचा गौरव ब्रह्मार्जुन पुरस्कार देऊन करण्यात येणार आ

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकवटणार सकल ब्राह्मण समाज; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  परळीतून ब्राह्मण ऐक्याचा 'हूंकार!': २५ फेब्रुवारीला परळी वैजनाथ  येथे राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन राज्यस्तरीय सर्व संघटनांचे संमेलन; दिशादर्शक मार्गदर्शन, चर्चासत्र, समस्यांवर भाष्य, विविध पुरस्कार ना.धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन: संत- महंतांचे आशीर्वचन, विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        'एकतेतून उन्नती' या सूत्राचा अंगिकार करुन ब्राह्मण समाजाच्या राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, अर्थिक, शैक्षणिक समस्यांवर विचारमंथन व त्यासोबतच वाटचालीचे दिशादर्शक मार्गदर्शन व्हावे यादष्टीने पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथून सकल ब्राह्मण ऐक्याचा 'हुंकार' पुकारण्यात आला आहे. परळी वैजनाथ  येथे २५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण एक दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असुन राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे, भाजप राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परिषदेसाठी  संत-महंतांचे आशीर्वच व विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती राहणार आ

श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याचे माजी अधिकारी  व्ही. एम. कुलकर्णी यांना मातृशोक श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यालय अधीक्षक विष्णू माधवराव कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई कुलकर्णी पंढरपूरकर यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. बरं मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते.     श्रीमती मालतीबाई माधवराव कुलकर्णी पंढरपूरकर या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यातच आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गोपालपाळे गल्ली येथून त्यांची अंत्ययात्रा निघून वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      श्रीमती मालतीबाई कुलकर्णी या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या असल्याने सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात  एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. कुलकर्णी परिवारावर कोसळलेल्या दु:खात  एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

इमेज
  भाजपचं सरप्राईज पॅकेज : अशोक चव्हाणांसह नांदेडमधूनच निष्ठावंताला राज्यसभेची उमेदवारी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे? अजित गोपछडे हे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहे. याशिवाय, ते एक कारसेवकही आहेत. पेशाने डॉक्टर असलेले अजित गोपछडे हे भाजपच्या वर्तुळातही फारसे माहिती नसलेले नाव आहे. राज्यातील सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, भाजपच्या पुण्यातील निष्ठावंत नेत्या मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार, हे जवळपास निश्चित होते. तर चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात राजकीय बस्तान बसवण्यासाठी राजकीयदृष्ट्या विस्थापित झालेल्या मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊन अखेर न्याय दिला आहे. मात्र, या सगळ्यात डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांना मिळालेली उमेदवारी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला अद्याप डॉ. अजित गोपछडे हे नाव तितकेसे परिचित नाही.

सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' प्रदान

इमेज
  बीड जिल्ह्याचा मोठा बहुमान: धर्मगुरु प.पू. अमृताश्रम स्वामी महाराजांचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' प्रदान परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... महाराष्ट्र शासनाकडून  सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा बहुमानाचा 'कीर्तन प्रबोधन पुरस्कार ' वितरण सोहळा नुकताच झाला.यामध्ये बीड जिल्ह्याचा मोठा बहुमान झाला असुन बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवारयांच्या हस्ते   सन्मान करण्यात आला.            बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)नवगण राजुरीकर   यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 13-02-2024 रोजी  सुधीर मुनगंटीवार  (सांस्कृतिक कार्य मंत्रालय) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अमृत आश्र

वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरानी संधीत रूपांतर करावे - कृषिमंत्री धनंजय मुंडे

इमेज
  वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरानी संधीत रूपांतर करावे - कृषिमंत्री धनंजय मुंडे मुंबई दि. 14 फेब्रुवारी - आजच्या शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवीधर घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.  डॉ पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.  ते म्हणाले की, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनाचे काम संपले असले तरी वास्तविक जीवनात त्यांची खरी परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. भारत सरकारने नुकतेच एम. एस. स्वामीनाथन यांना नुकतेच मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले आहे. कै स्वामीनाथन यांनी वेगवेगळ्या वाणांचे संशोधन करून देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवली व देशासमोरील अन्नधान्याचे संकट दूर केले. त्यांची प्रेरणा घेऊन काम केल्यास तुमच्यातूनच एखादा स्वामीनाथन तयार होऊन देशासमोरील मोठ्य

महिलांची लक्षणिय उपस्थिती; वीरशैव समाजाचा उपक्रम; महाप्रसादाने सांगता

इमेज
 संत शिरोमणी श्री  मन्मथ स्वामी जन्मोत्सव जल्लोषात साजरा श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांचे आशिर्वचन महिलांची लक्षणिय उपस्थिती; वीरशैव समाजाचा उपक्रम; महाप्रसादाने सांगता परळी वैजनाथ /संतोष जुजगर येथील श्री  गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) मध्ये विरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव आज बुधवार दिनांक 14 फेबु्वारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी श्री जगमित्र नागा मंदिर येथून श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांची श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पूजा व महाआरती केली. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी पाळना म्हणला व पुजा केली.यावेळी श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांची प्रमुख उपस्थिती होती. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींचा जन्मोत्सवानंत

परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर

इमेज
  परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर परळी वैजनाथ धरणात पाणी असूनही चार दिवसाआड पाणी पुरवठा व जागोजागी फुटलेल्या पाईपलाईनमुळे भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे नगर परिषदेने पाईपलाईनची दुरुस्ती करून दोन दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीतच शहरातील अनेक भागातील बोर आटू लागले आहेत.  मात्र परळी वैजनाथ नगर परिषद प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. जनतेच्या कररूपी पैश्यातून चालणारी नगर परिषद मात्र नागरिकांना होणाऱ्या त्रासाला उत्तर शोधण्यास असमर्थ आहे. परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर वाण धरणात 65 टक्के पाणी साठा आहे. हे पाणी दोन वर्षे पुरेल एवढे आहे. असे असतानाही परळी शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे असा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. परळी शहरात 4-5 दिवसाआड येणारे पाणी आता पुरे होत नाही. त्यात अनेक बोर आटून चालले आहेत. शहरात फुटलेल्या पाईपलाईन मध

नाशिक येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी निवड

इमेज
  सिंदफणा शाळेच्या नाट्य अभिवाचनाला प्रथम पारितोषिक  नाशिक येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी निवड  माजलगाव (प्रतिनिधी)   बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनामध्ये  सिंदफणा पब्लिक स्कूलच्या नाट्य विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 'दगडुला पडलेला प्रश्न ' या नाट्य अभिवाचनाला प्रथम पारितोषिक   मिळाले. याबद्दल सिंदफणा शाळेवर तसेच नाट्य विभागावार कौतुकाचा वर्षाव होत आहे.   सविस्तर वृत्त असे की, बीड येथे दिनांक ६ व ७ फेब्रुवारी दरम्यान १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने स्थानिक कलावंताना संधी देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी नाट्य अभिवाचन स्पर्धेमध्ये सिंदफणा पब्लिक स्कूलच्या नाट्य विभागाचे संचालक सखाराम जोशी, शिक्षक प्रवीण मडके, कृष्णा नवले व ललिता सोळंके यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी विजयकुमार राख लिखित तसेच कृष्णा नवले दिग्दर्शित 'दगडूला पडलेला प्रश्न ' हे नाट्य अभिवाचन सादर केले. ग्रामीण जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या या नाट्य अभिवाचनास मान्यवर आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाट्य

पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय

इमेज
  पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय *मुंबई दि 13 फेब्रुवारी 2024-* पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पिक विम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पिक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भ

वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन

इमेज
  वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन  रासेयेतून सामाजिक जबाबदारीचे जाणिव होते - प्रा . डॉ . संजय खडप थोर व्यक्तींचे संस्कार आत्मसाथ करण्यासाठी एन . एस.एस. - प्रा . डॉ . मकरंद जोगदंड परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  दि . ८ ते १४ फेब्रुवारी  २०२४ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ . रमेश राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले . यासात दिवशीय शिबिरात समाजिक प्रबोधन सह विशेष जलसंवर्धनासाठी पाझर तळे निर्मिती पाणी अडवा पाणी जिरवा - श्रमदान, आधार काटीचा संवाद जेष्ठांशी, महिला मेळावा - बालविवाह प्रथा निर्मूलन आणि प्रतिबंध कायदा जनजागरण, स्वच्छता आभियान उपक्रम राबविण्यात येणार आहेत . शिबिराच्या उद्धाटन संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक म्हणुन  सामाजिक जाणिवेच प्रबोधन करणारे कवी डॉ . संजय खडप, प्रा . डॉ . मकरंद जोगदंड ,प्राचार्य अरूण पवार, सरपंच सौ शाहुताई विजय राठोड,  रा. से . यो. चे प्रा
इमेज
  पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल ! सहापानी चिठ्ठीत सापडली आत्महत्येची कारणं; मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येस  प्रवृत्त परळी वैजनाथ , प्रतिनिधी...       शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना दि.६  रोजी उघडकीस आली. परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.तसेच या आत्महत्येबाबत अनेक तर्क वितर्क व चर्चांना उधाण आले होते.आज अखेर प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान सहापानी चिठ्ठीत  आत्महत्येची कारणं सापडली आहेत.यातून मानसिक त्रासाला कंटाळून  आत्महत्येस  प्रवृत्त झाल्याचे दिसून येत आहे.यावरुन व मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रलहाद रंगनाथ सांवत यांनी दि. 06/02/2024 रोजी प्रेम पन्ना आपार्मेट मध्ये गळाफास घेवुन आत्महत्या केल्याने पो. स्टे ला आकस्मात क्र. 02/2024