वैद्यनाथ भूषण जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी

 २५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद : वैद्यनाथ भूषण जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार जाहीर 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         परळी वैजनाथ येथे २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेत राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव होणार आहे. 

      समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान होणार आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परळी वैजनाथ पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा वैद्यनाथ भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.तर पौरोहित्य वर्गवारीत ब्रह्मश्री, महिला वर्गवारीत राज्यस्तरीय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींचा बह्मभूषण मनस्वीनी पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. विविध कला, क्रीडा, कथा,कीर्तन, प्रबोधन, शिक्षण, माहिती प्रसारण,संस्कृती रक्षण या वर्गवारीत ब्रह्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत. विविध संघटनात्मक काम करून ब्राह्मण संघटन मजबूत करणाऱ्या संघटना प्रमुखांचा गौरव ब्रह्मार्जुन पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.


Click:🛑 *परळीतून ब्राह्मण ऐक्याचा 'हूंकार!': २५ फेब्रुवारीला परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन* *_ना.धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन: संत- महंतांचे आशीर्वचन, विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती_* *राज्यस्तरीय सर्व संघटनांचे संमेलन; दिशादर्शक मार्गदर्शन, चर्चासत्र, समस्यांवर भाष्य, विविध पुरस्कार*


       विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परळी वैजनाथ पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा वैद्यनाथ भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. यामध्ये डॉ. जे. जे. देशपांडे,श्री शरदराव कुलकर्णी श्री. वसंतराव देशमुख,प्रा.मधू जामकर,डॉ. भगवानराव सेवेकर श्री उत्तमराव जोशी,डॉ लता रायते,श्री रामदास दादा रामदासी श्री.मनोहरदेव जोशी,श्री. विनायकराव खिस्ते श्री. कुमार पुराणीक डॉ. प्रदीपराव जबदे यांचा सन्मान होणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार