जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर देणार

 बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा होणार-राजेश गित्ते 



जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर देणार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रति वर्षी प्रमाणे या ही वर्षी विविध सामाजिक उपक्रम आणि जागृत देवस्थान येथे अभिषेक करून प्रितमताई मुंडे यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

    परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे बेलंबा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वाटर फिल्टर बसवण्यात येणार आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

परळी वैजनाथ तालुक्यातील  जागृत देवस्थान केदारेश्वर (वैजवाडी), काळभैरवनाथ (मांडवा), दत्तगुरु (दादाहारी वडगांव)बेलेश्वर भगवान (बेलंबा) मंदिरात अभिषेक व पुजा करुन प्रितमताई मुंडे यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

  वरील सर्व कार्यक्रम मा पंचायत समिती सदस्य मारोतराव फड,मा पंचायत समिती सदस्य भरतराव सोनवणे,भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर गिते,  बाळासाहेब चव्हाण जिल्हाध्यक्ष वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना बीड, मांडवा मा सरपंच सुंदर मुंडे,दादाहारी वडगांव सरपंच शिवाजी कुकर,सेलु सरपंच बाळासाहेब फड,नंदनंज मा सरपंच अनिल गुट्टे, नंदनंज सरपंच सुनील योगीराज गुट्टे,सेलु चेअरमन दत्तात्रय गुट्टे,कासारवाडी मा सरपंच दशरथ (दादा) गुट्टे,,लोणारवाडी मा सरपंच नवनाथ मुंडे,मिरवट मा सरपंच धुराजी साबळे, लोणी मा सरपंच प्रल्हाद शिंदे,बेलंबा गावचे सरपंच बाबासाहेब सरवदे, नंदनंज उप सरपंच बालाजी गुट्टे, माऊली आंधळे ,वैजवाडी ग्राम पंचायत सदस्य राजेभाऊ भांगे, गोविंदराव यमगर ,भाजपा सामाजिक कार्यकर्ते गोपाळ केंदे,अदि मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मौजे बेलंबा तालुका परळी वैजनाथ येथे शनिवार दि.१७/०२/२०२४रोजी सकाळी १०वाजता होणार आहे.बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या समाजोपयोगी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वैधनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार