पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' कार्यशाळा यशस्वी

पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  2020' कार्यशाळा यशस्वी     


    
     

    सिरसाळा : (प्रतिनिधी )  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व येथील श्री. पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मराठी विभागाच्या संयुक्त विध्यमाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा दि.१७/०२/२०२४, शनिवार रोजी संपन्न झाली.या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणुन . व्यंकटराव कदम साहेब (अध्यक्ष. रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनपेठ.) उदघाटक म्हणुन डॉ.संजय शिंदे (जनसंपर्क जनसंपर्क अधिकारी .डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.) तर बीजभाषक म्हणुन प्रोफेसर.डॉ. रोहिदास नितोंडे (उप प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी )  यांच्यासह संस्था सचिव मा, श्री. योगेश कदम साहेब, महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रोफेसर डॉ. के. के. पाटील,कार्यशाळेचे समन्वयक प्रोफेसर. डॉ. एम. बी. धोंडगे (अधिसभा सदस्य, डॉ. बा. आं. म. वि. छ. संभाजीनगर.),नॅक समन्वयक डॉ. ए. व्ही. जाधव, आय.क्यू ए. सी. समन्वयक, डॉ.विक्रम धन्वे,डॉ. अहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते    या कार्यशाळेच्या प्रस्ताविकात कार्यशाळेचे समन्वयक प्रोफेसर डॉ. एम. बी. धोंडगे यांनी कार्यशाळा घेण्यामागची भूमिका व उद्धेश विषद केला                    

       या कार्यशाळेतील उदघाटन पर मार्गदर्शनात डॉ. संजय शिंदे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या बाबतीत मार्गदर्शन करीत असतांना या शिक्षण धोरणाची गरज, भूमिका, उद्धेश तसेच या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करीत असतांना केंद्र सरकार, राज्य सरकार व विद्यापीठ पातळीवर घेण्यात येत असलेले निर्णय,तसेच या धोरणातू बहुविद्याक्षाखीय कौशल्यभिमुख अभ्यासक्रम, विद्यापीठ बहि:शाल शिक्षण विभागाची कार्यपद्धती इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला          

         तसेच या कार्यशाळेचे बिजभाषक पर मार्गदर्शनात प्रोफेसर डॉ. रोहिदास नितोंडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020  या विषयावर सखोल मार्गदर्शन करीत असतांना राष्ट्रातील तरुणांना कौशल्यभिमुख अभ्यासक्रम,त्यातून राष्ट्राचा सर्वांगीन विकास, यातून राष्ट्रशक्तीत होणारी वाढ या शिक्षण धोरणातून  भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असलेली नैतिकमूल्य,सांस्कृतिक सभ्यता  तसेच उदयनमुख भारताला वैश्विक स्तरावर विज्ञान,तंत्रज्ञान, माहिती क्षेत्रात विश्व गुरु बनविण्याबरोबर सामर्थशाली राष्ट्र  उदयास येण्याचा आशावाद व्यक्त केला.त्यासोबतच या शैक्षणिक धोरणाची समग्र कार्यपद्धती तसेच राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ स्तरावर अंमलबजावणी संदर्भात करण्यात येत असलेली कार्य पद्धती, त्यासोबत या धोरणातून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्र ज्ञानाचा होणारा वापर, शक्ती शाली राष्ट्र निर्माण होण्यासाठी उच्य शिक्षणात संशोधन कार्याला उपयोजनात्मक क्रियात्मक  मुर्त रूप देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फॉउंडेशन, संशोधन विकास मंडळ, इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले   या कार्य शाळेच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव मा. योगेशजी कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरण राष्ट्रासाठी, समाजासाठी कसे उपयुक्त ठरेल यावर प्रकाश टाकला.    

  या कार्यशाळेचा समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. के. के. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या शासन स्तरावरील कार्यभार, पदनिर्मिती व या धोरणाची  महाविद्यालय स्तरावर अंमलबजावणी करतेवेळी येणाऱ्या तांत्रिक उणीवा इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला.या कार्यशाळेसाठी महाविलायातील दोनशे विध्यार्थी, विध्यार्थीनी, प्राद्यापक  शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतक्ष उपस्थित होते तर आभासी माध्यमातून पंचेचाइस व्यक्तीनी सहभाग नोंदवीला या कार्य शाळेचे सूत्रसंचालन डॉ. ए. व्ही. जाधव यांनी केले तर आभार डॉ.विक्रम धन्हे यांनी मानले. हि कार्य शाळा यशस्वी करण्यासाठी महाविलायातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती अनमोल सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !