इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरा

 खा.डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरा



वंचित, शोषित, निराधार व दिव्यांगांसाठी सुरू केलेला सेवा यज्ञ अहोरात्र सुरू राहण्यासाठी प्रितमताई यांना दिर्घ आयुष्य लाभो -राजेश गित्ते 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे बेलंबा तालुका परळी वैजनाथ येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना वैधनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली की प्रत्येकी वर्षी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशानुसार सेवा भाव ठेवून वाढदिवस साजरा करण्यात येतो.या ही वर्षी आपण बेलंबा येथे हा कार्यक्रम घेत आहोत.लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवुन वंचित, शोषित, निराधार, दिव्यांगांसाठी सेवा यज्ञ अहोरात्र सुरू केलेला आहे या कार्यात आपला ही खारीचा वाटा असावा आपण ही या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मदत करावी या हेतूने दरवर्षी दोन्ही ताईंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेत आहोत आणि भविष्यात ही असे समाजोपयोगी उपक्रम राबवत राहु असे मनोगत राजेश गिते यांनी व्यक्त केले.तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी वंचित, शोषित निराधार दिव्यांगांसाठी सुरू केलेला सेवा यज्ञ अहोरात्र सुरू राहण्यासाठी प्रितमताई यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रभु बेलेश्वर भगवान चरणी प्रार्थना राजेश गिते यांनी केली.

या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री देशपांडे सर यांनी शाळेच्या वतीने मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी वाटर फिल्टर दिल्या बद्दल संयोजकांचे आभार मानले.

या कार्यक्रमास मा पंचायत समिती सदस्य मारोतराव फड, दादाहारी वडगांव सरपंच शिवाजी कुकर, सेलु सरपंच बाळासाहेब फड,सेलु चेअरमन दत्तात्रय गुट्टे, बेलंबा गावचे सरपंच बाबासाहेब सरवदे,सेलु उपसरपंच धम्मानंद बटाटे, वैजवाडी ग्राम पंचायत सदस्य राजेभाऊ भांगे, मलकापूर जेष्ठ नेते रमेश गिते, फुलचंदराव गिते पाटील, विठ्ठल दिनकरराव गिते,दशरथ भाऊ गिते, बेलंबा सेवा सहकारी सोसायटी संचालक बालाजी गिते, कांतीलाल गिते, प्रकाश गिते, विलास गिते, गोविंद गिते आदि मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे सर, देशमुख सर, चौधरी सर,काचे सर,तलवारे सर, यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्ताविक प्रा अजय गिते यांनी  आणि आभार प्रदर्शन श्री काचे सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!