परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 संत सेवाभाया हे मानवतावादी संत -विठ्ठल चव्हाण


संत सेवालाल यांची जयंती मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या उपस्थितीत साजरी


परळी /भगवान साकसमुद्रे 


राष्ट्रसंत सेवाभाया महाराज हे मानवतावादी संत असून त्यांच्या अनुयायांनी मानवी हक्क अधिकारांचे संवर्धन करण्यासाठी संघर्ष करावा असे प्रतिपादन गोर सेनेचे नेते अमरावती विभाग  उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण  यांनी केले

संत सेवाभाया यांच्या २८५व्या जयंतीनिमित्त परळी येथील शक्तीकूंज वसाहतीतील श्रीराम मंदिर येथे केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड, तर प्रमुख पाहुणे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये , उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, राजीव  रेड्डी, उदार,कल्याण अधिकारी शरद राठोड ,सुशील राठोड ,कुंदन राठोड, सुरक्षा अधिकारी बी आर अंबाड, कुलकर्णी,बालाजी  पवार, सेवानिवृत्त वि. के पवार आदी प्रमुख उपस्थिती होती

विठ्ठल चव्हाण पुढे म्हणाले की, संत सेवाभायांनी निसर्गाचा तसेच पशुसंवर्धनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संदर्भ लावला.मानवी हक्क अधिकारांचे साठी संघर्ष करावा. वर्तमान परिस्थितीत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे.

 मान्यवर होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी तर आभार जूनियर केमिस्ट प्रसाद जाधव यांनी मानले.

त्यावेळी महिला पारंपरिक वेशात उपस्थित होत्या . महिलनी पारंपरिक बंजारा गीतांचे गायन , नृत्य सादर केली.युवक -युवती पदाधिकारी  मोठया प्रमाणावर उपस्थित होते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!