प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहात

  शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहात

परळी,( प्रतिनिधी):- हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात परळी शिवसेना युवासेनेच्या वतीने संपन्न झाली,याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तींचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने लवकरच सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात  आले.

शिवसेना परळी तालुकाप्रमुख शिवाजी जिजा शिंदे,उपजिल्हाप्रमुख अँड रामराव माने,विधानसभा जेष्ठ नेते धनंजय गित्ते साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख बालासाहेब देशमुख,युवासेना तालुकाप्रमुख सोमेश्वर गित्ते,युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ,युवा नेते सचिन स्वामी,युवासेना विधान सभा प्रमुख दिपक जोशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया आनंददायी वातावरणात संपन्न झाली,यावेळी बोलतांना शिवसेनेचे नेते तथा शिवसेना शिवजयंती उत्सव समितीचे सचिन स्वामी यांनी  शिव जयंतीनिमित्त सर्वरोग निदान महा शिबिराविषयी सखोल माहिती दिली, व येणाऱ्या काळात विविध सामाजिक बांधिलकी कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी माजी मुख्याध्यापक बळवंत चव्हाण सर यांचा उत्सव समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तम लोखंडे,पापा सुरवसे,राजेभाऊ देशमुख,व्यापारी विनोद कौलवार,गणेश सावंत,बाळकृष्ण फुले,ऋषिकेश कौलवार,रामचंद्र जाजु,राजु कौलवार,पत्रकार श्रीराम लांडगे,युवा नेते शरद कावरे,निलेश देशमुख,पद्माकर जाधव,अंकुश  यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना,युवासेनेच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नेते संजय गावडे,रमेश लोखंडे युवासेना शहारसचिव शैलेश कदम,युवासेना शहरसंघटक नवनाथ अप्पा लोभे,युवासेना उपशहरप्रमुख सागर बुंदुले,युवासेना उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर मुंडे,जेष्ठ शिवसैनिक राजेभाऊ कदम नारायण मानकर,गोविंद चिवडे ,नवनाथ सरवदे,राजेश लोणीकर,, जगन्नाथ फुके,हामीद शेख,नवनाथ सरवदे,राजाभाऊ,कोंडीबा कुकर,गंगाधर काळे,भगवान साखरे,अंकुश दहिफळे,बालाजी धुमाळ,भाऊसाहेब कुकर,भरत नाईकवाडे,,गणेश चौरे,हनुमान सरवदे,दत्ता साबळे,अशोक धोकटे,,वैजनाथ लोखंडे,राहुल गित्ते,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या