महाराष्ट्र विद्यालय संकुलात शिवजयंती मोठया उत्साहात

 महाराष्ट्र विद्यालय संकुलात शिवजयंती मोठया उत्साहात 




परळी / प्रतिनिधी


हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र विद्यालय संकुलात मोठ्या उत्साहात

संपन्न झाली याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या प्रसंगी संकुलाचे प्राचार्य विनायक राजमाने, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे,पर्यवेक्षक सुरेंद्र हरदास यांच्यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी मुरलीधर बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य विनायक राजमाने यांनी करत शिव छत्रपतींना  रयतेचे राजा का म्हटले जाते हे विषद केले.यावेळी उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त करत भाषणे केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !