लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

 शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज कल्याणकारी राजे होते- प्रा प्रसाद देशमुख




लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


परळी वैजनाथ दि.१९ (बातमीदार)

        शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज कल्याणकारी राजे होते असे प्रतिपादन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांनी केले. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

                लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा प्रसाद देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते, स्वराज्याची स्थापना करुन जनतेचे कल्याण करणारे राजे होते. यावेळी गौरी पुजारी या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा फुटके यांनी केले. यावेळी प्रा प्रविण नव्हाडे, प्रा विशाल पौळ, अनिल पत्की, सुहास कण्व, मारुती देमगुंडे सह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !