◆माकपची परळी तहसील कार्यालय समोर जोरदार निदर्शने

 ◆ माकपची परळी तहसील कार्यालय समोर जोरदार निदर्शने


परळी/प्रतिनिधी


शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी एमएसपी चा कायदा लागु करावा व आशा व गटप्रवर्तांकांना जाहीर केलेला मानधन वाढीचा जीआर लागु करावा या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी तहसील कार्यालया समोर शुक्रवारी (ता.१६) तीव्र निदर्शने करण्यात आली.

            किसान मोर्चाच्या वतीने दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रामीण भारत बंद व संपाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता.१६) माकप च्या वतीने परळी तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना सर्वसमावेशक उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा मिळुन किमान आधारभूत किंमतीचे (एमएसपी) देण्याचे दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पुर्ण करावे, आशा व गटप्रवर्तांकांच्या वाढीव मानधनाचा जी आर काढुन तात्काळ अंमलबजावणी करावी, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा उपकार्यालय परळीत सुरू करावे, दलीत आदिवासी यासारखे उपेक्षित समुदाय आणि महिला शेतकऱ्यांच्या जमिनींच्या हक्काचे संरक्षण करा, गायरान जमिनी कसणारे भुमिहीन मजुरांच्या नावे शेतजमीन करा यासह विविध मागण्यांचा समावेश होता. निदर्शने आंदोलनात माकपचे जेष्ठ नेते कॉ पी एस घाडगे माकपचे जिल्हा सचिव अँड. अजय बुरांडे, सिटु चे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे, किसान सभेचे कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ गंगाधर पोटभरे, कॉ सुदाम शिंदे, पप्पु देशमुख, बालासाहेब कडभाने, कॉ भगवान बडे, कॉ किरण सावजी, कॉ सुवर्णा रेवले,कॉ मदन वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !