पोस्ट्स

MB NEWS:आज विजेवरील इंजिनाची अंतर्गत तपासणी तर दि.29 रोजी परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गावर अधिकृत चाचणी

इमेज
  आज विजेवरील इंजिनाची अंतर्गत तपासणी तर दि.29 रोजी परळी ते पोखर्णी नृसिंह  आणि परळी ते लातूररोड मार्गावर अधिकृत चाचणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे.आता आज दि.२७ जानेवारी राेजी दुपारी  ४ वा.विद्युतीकरणाची अंतर्गत तपासणी करून विजेवरील इंजिनाची दि.29 रोजी चाचणी घेतली जाणार आहे.        परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड दरम्यानच्या रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे  सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विजेवरील इंजिनाची अंतर्गत चाचणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड   मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची चाचणी दि.29 रोजी केली जाणार आहे. प्रथमच विजेचे इंजिन धावणार         प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर पथकाकडून तपासणी केली जाईल. वीजपुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची तपासणी केली जाते. अनावश्यक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही ना, याची चाचपणी केली जाते. त्यानंतर विज

MB NEWS:आज ४ वा. विजेवरील इंजिनाची चाचणी: परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण

इमेज
  आज ४ वा.  विजेवरील इंजिनाची चाचणी: परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे.आता आज दि.२७ जानेवारी राेजी दुपारी  ४ वा.विद्युतीकरणाची तपासणी करून विजेवरील इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे. संबंधित बातमी: पहा- 🛑 GROUND REPORT:-परळी वैजनाथ रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात. #mbnews #subscribe #like #share #comments         परळी ते पोखर्णी नृसिंह दरम्यानच्या रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे  सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विजेवरील इंजिनाची चाचणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची चाचणी केली जाणार आहे. प्रथमच  विजेचे इंजिन धावणार         प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर पथकाकडून तपासणी केली जाईल. वीजपुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची तपासणी केली जाते. अनावश्यक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही ना, याची चाचपणी केली जाते.

MB NEWS:वसंतनगर परिसरातील 'अंधारखोळी' वनविभाग जमीनवर पंधरा लाख लिटर साठवण क्षमतेच्या जलकुंभ चारशे हाताच्या श्रमदानातून तयार

इमेज
  वसंतनगर परिसरातील 'अंधारखोळी' वनविभाग जमीनवर पंधरा लाख लिटर साठवण क्षमतेच्या जलकुंभ चारशे हाताच्या श्रमदानातून तयार परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर , सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  सात दिवशीय शिबिर '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' ही संकल्पनावर घेऊन जल सक्षारता संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा , पर्यावरण आकलन आचरण आणि श्रमदानातून दोनशे युवक - युवतीच्या चारशे हातानी, सात दिवस सलग  आठ तास श्रमदानतून पन्नास तासात अंधार खोळी  परिसर वनविभाग डोंगऱ्याच्या कुशीत हा जलकुंभ पाझर तलाव श्रमदान तयार केला . हा उपक्रम संकल्पना रा . से . यो. संयोजक  प्रा . डॉ . माधव रोडे, व सखाराम नाईक ज्युनिअर कॉलज प्राचार्य अरूण पवार ,  सरपंच विजय राठोड यांच्या राबविली .   वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम यांच्या हस्ते श्रमदानस प्रारंभ झाला . तसेच अंकुर बीज बँक स्थापना प्राचार्य अरूण पवार यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमास   संपन्न . प्रा . उत्तम कांदे,कार्यक्रमधिकारी प्रा . डॉ . भीम

MB NEWS:■संविधान हाच धर्मग्रंथ -माजी न्यायमूर्ती तिडके

इमेज
 ■संविधान हाच धर्मग्रंथ -माजी न्यायमूर्ती तिडके परळी / प्रतिनिधी सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या भारत देशात संविधान हाच सर्वांचा धर्मग्रंथ तर जनगणमन हीच सर्वांची प्रार्थना आहे असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी.आर. तिडके यांनी केले.मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन परळी तालुक्यातील मोहा येथे महाराष्ट्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संकुलात मोठ्या हर्ष उल्हास साजरा करण्यात आला महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे, सखाराम शिंदे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सेवा सोसायटीचे कर्मचारी, विद्यार्थी, पालक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे ब

MB NEWS: आ.धनंजय मुंडे यांचे हात बळकट करा: आ.विक्रम काळे यांना प्रथम पसंतिचे मत देऊन विजयी करा-प्रदीप खाडे

इमेज
  आ.धनंजय मुंडे यांचे हात बळकट करा: आ.विक्रम काळे यांना प्रथम पसंतिचे मत देऊन विजयी करा-प्रदीप खाडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे जिव्हाळ्याचे सहकारी आ.विक्रम काळे यांना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व आ. धनंजय मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रथम पसंतिचे मत देऊन पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन अध्यक्ष कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्था व नाथ शिक्षण संस्थेचे सह सचिव प्रदीप खाडे यांनी केले आहे.            महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक - २०२३ साठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवार तसेच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आ.धनंजय मुंडे  यांचे जिव्हाळ्याचे सहकारी आ.विक्रम काळे यांना सर्वाधिक मतदधिकय परळी मतदारसंघतील शिक्षक मतदार बांधवयांनी देऊन विजयी करावे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत.  शिक्षण क्षेत्राचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व आहेत. मागील सलग तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत अस

MB NEWS:नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र

इमेज
  नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र  सिरसाळा (प्रतिनिधि):- येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय ,जनविकास महाविद्यालय बनसारोळा, वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर, कै.  रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमान *राज्यस्तरीय नवीन शैक्षणिक धोरण 2020* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन दि. २५ जाने. २०२३ रोजी करण्यात आले होते.   या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूराव भुसारे हे होते, उद्घाटक मा. भगवानराव मोहिते, मा. रामेश्वर कदम हे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी एन मोरे हे होते. तर विशेष उपस्थितीत प्राचार्य डॉ. अरुण दळवे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व प्राचार्य डॉ. एच पी कदम हे होते. सर्वप्रथम श्री पंडितगुरु पार्डीकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांनच्या हस्ते करण्यात आले आणि मतदार जन जागृती शपथ घेण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. डी एन मोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे हे सर्वांच्या समोर मोठे आव्हान आहे, या धोरणा

MB NEWS: कै.शंभुदेव ढाकणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ७ वी वर्गात प्रथम विद्यार्थ्याला २१०० रू पारितोषिक केले जाहीर

इमेज
  कै.शंभुदेव ढाकणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ७ वी वर्गात प्रथम विद्यार्थ्याला २१०० रू पारितोषिक केले जाहीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी           गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य अंजली दत्ताजी ढाकणे यांनी सातवी वर्गात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 2100 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.        आज ७४ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त अस्वलअंबा ग्रामपंचायत व जि.प उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहणास सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व  विद्यार्थी व शिक्षकांसह गावातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते . यावेळी ग्राम पंचायत सदस्य अंजली दत्ताजी ढाकणे यांनी  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कै.शंभुदेव ढाकणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इयत्ता  ०७ वी च्या वर्गातील सर्वात हुशार गुणसंपन्न विद्यार्थ्यास २१०० रू बक्षीस देण्याचे जाहीर केले.हे बक्षीस प्रतिवर्षी १५ आॕगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी देण्यात येईल . या सुरू केलेल्या नविन उपक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त पणे स्वागत केले.

MB NEWS:झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांना धावत्या मोटरसायकलवर रिल बनवणे अंगलट:भिषण अपघात

इमेज
  झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांचा भिषण अपघात: धावत्या मोटरसायकलवर रिल बनवणे अंगलट पाथरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांना धावत्या बाईकवर रिल्स बनवणे अंगलट आले आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ऑटो सोबत भीषण अपघात झाला. यात चारही विद्यार्थी जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा भीषण अपघात आज सकाळी 6. 45 वाजेच्या दरम्यान पाथरी ते सोनपेठ मार्गावर शाळेच्या अगदी जवळ झाला. पाथरी ते सोनपेठ रस्त्यावर श्री चक्रधर स्वामी खाजगी शाळा आहे. या शाळेत डाकूपिंप्री ता पाथरी येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावातील 9 व्या वर्गात शिकणारे चौघे स्वप्नील ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल महादू तिथे , योगानंद कैलास घुगे ,शंतनू कांचन सोनवणे सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास शाळेकडे निघाले होते. चौघे एकाच बाईकवर जात असताना रिल शूट करत होते. शाळेच्या जवळ आले असता एका हातात मोबाईल आणि एका हाताने बाईक चालवताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. याचवेळी समोरून येणाऱ्या पीकअप रिक्षाने बाईकवरील चौघांना उडवले. यात चौघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर

MB NEWS:२५ किलो गांजा पकडला; पोलिसांची कामगिरी

इमेज
  २५ किलो गांजा पकडला; पोलिसांची कामगिरी  गेवराई..... शहरालगत असणा-या बाह्यवळण रस्त्या जवळ एका हॉटेल मध्ये २५ किलो गांजा विक्रीसाठी येत आहे अशी माहिती गुप्त खब-या मार्फत गेवराई पोलिसांना मिळाली व तात्काळा वरिष्ठ अधिकारी यांचे पथक घटनास्तळावर दाखल झाले व हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली असता त्या ठिकाणी २५ किलो गांजा सापडला व एकाला गेवराई पोलिसांनी जेरबंद केले असुन त्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे.    गौसखान अमनउल्ला खान  वय ४५ वर्ष राहणार गेवराई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन बुधवार रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास गेवराई पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांना गुप्त खब-या मार्फत माहिती मिळाली कि येथील बाह्यावळण रस्त्या जवळ एका हॉटेलवर २५ कीलो गांजा विक्रीसाठी येत आहे.यावर तात्काळ पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार व प्रफूल्ल साबळे हे आपल्या सहकारी यांना घेऊन घटनास्थळी जाऊन छापा मारला असता यामध्ये २५ किलो गांजा नावाचा आम्लपदार्थ मिळून आला. तसेच वरील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या

MB NEWS:ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनच्या मराठवाडा सहप्रभारीपदी परळीचे ॲड. मेहूल तोतला

इमेज
  ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनच्या मराठवाडा सहप्रभारीपदी परळीचे ॲड. मेहूल तोतला परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनच्या ( AIFAA) मराठवाडा सहप्रभारी व सरचिटणीस महाराष्ट्र पदी परळीचे ॲड. मेहूल तोतला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.           ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट्स अँड असोसिएशनचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष - अॅड.रवी प्रकाश जाधव (भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे अधिवक्ता) यांनी नविन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुळचे परळीचे असलेले ॲड. मेहूल तोतला यांची मराठवाडा सहप्रभारी व सरचिटणीस महाराष्ट्र पदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS:भीमा नदीपात्रात मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच, त्या सात मृतदेहानंतर पुन्हा एक मृतदेह सापडला

इमेज
  भीमा नदीपात्रात मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच, त्या सात मृतदेहानंतर पुन्हा एक मृतदेह सापडला नागरगाव (ता.शिरूर) येथे भीमानदीकाठी दि.२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा या भागात मृतदेह आढळून येण्याचे सत्र सुरुच आहे. हा मृतदेह पारगाव सा.मा.येथील व्यक्तीचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आधी १८ ते २४ जानेवारी या काळात भीमानदीपात्रात दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. संबंधित मयत व्यक्तींचा खुन करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून आजपर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असुन बदला घेण्यासाठी हे खुन झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भीमानदीकाठी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे.  या घटनेमुळे पुन्हा एकदा भीमानदीकाठ चर्चेत आला आहे. घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

MB NEWS:पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना पुरस्कार जाहीर

इमेज
  पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना  पुरस्कार जाहीर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. Padma Awards 2023:  केंद्र सरकारने 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  सन 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 106 पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब करत मंजूरी दिली आहे. यंदाच्या वर्षी एकूण 106 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा एकूण 19 महिलांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे. यापैकी परदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीपी या श्रेणीमध्ये दोन पद्म विजेत्यांचा समावेश आहे. तर 7 मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश या यादीमध्ये आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्री दीपकजी धर, श्री कुमारजी मंगलम बिरला,

MB NEWS:मुलायम सिंह यांना पद्म विभूषण, सुधा मूर्तींना पद्म भूषण, झुनझुनवालांना पद्म श्री; पाहा यादी

इमेज
  मुलायम सिंह यांना पद्म विभूषण, सुधा मूर्तींना पद्म भूषण, झुनझुनवालांना पद्म श्री; पाहा यादी यंदा केंद्र सरकारने एकूण 106 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश Padma Awards 2023:  केंद्र सरकारने 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  सन 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 106 पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब करत मंजूरी दिली आहे. यंदाच्या वर्षी एकूण 106 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा एकूण 19 महिलांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे. यापैकी परदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीपी या श्रेणीमध्ये दोन पद्म विजेत्यांचा समावेश आहे. तर 7 मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश या यादीमध्ये आहे. मुलायम सिंह यांना पद्म विभूषण समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रम

MB NEWS:प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

इमेज
  प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याच्या (India Independence Day) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. याचा एक भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी (Prisoners Release) देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) घेतला आहे. चांगली वर्तवणूक व इतर निकषांनुसार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) महाराष्ट्रातील 189 बंद्यांना विशेष माफी (Prisoners Release) देऊन त्यांची कारागृहातून मुक्तता केली जाणार आहे. अशी माहिती कारागृह प्रशासनाने गुरुवारी (दि.19) दिली. 15 ऑगस्ट 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 या काळातील बंदीवानांना विशेष माफी देऊन मुक्त (Prisoners Release) केले जाणार आहे. कैद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनावे यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ⚜️ *या कैद्यांना मिळणार माफी* ⚜️ यासाठी संबंधित कैद्याचे कारागृहातील वर्तन चांगले असणे

MB NEWS:शहरातील वैद्यनाथ बँक कॉलनी भागात शहर पोलिसांनी पेट्रोलिंगची गस्त वाढवावी : विशाल मुंडे

इमेज
   वैद्यनाथ बँक कॉलनी भागात शहर पोलिसांनी पेट्रोलिंगची गस्त वाढवावी : विशाल मुंडे परळी प्रतिनिधी : परळी शहरातील परळी अंबाजोगाई रोडवरील वैजनाथ बँक कॉलनीत गेली अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढत असल्याने शहर पोलिसांनी पेट्रोलिंग ची गस्त वाढवावी अश्या  मागणीचे निवेदन आज परळी शहर पोलिसांना भाजपचे युवा नेते विशाल मुंडे यांनी दिले आहे. सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील वैजनाथ बँक कॉलनी भागात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून, दिनांक 24 जानेवारी रोजी मध्यरात्री वैजनाथ बँक कॉलनी येथील सोडगीर यांच्या घराच्या चैनल गेटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न तीन ते चार चोरट्यांनी केला मात्र आजूबाजूच्या लोकांना लागलीच जाग आल्याने नागरिकांनी आरडा ओरड केली त्यामुळे चोरांनी तेथून लागलीच पोबारा केला तरी या कारणास्तव शहर पोलिसांनी बँक कॉलनी भागातील सर्वच भागांमध्ये व विशेषत वैजनाथ गॅस गोडाऊन च्या मागील बाजूस पेट्रोलिंग गस्त वाढवून नागरिकांना सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे युवा नेते विशाल मुंडे यांनी परळी शहर पोलिसांना दिले असून, या निवेदनावर  बाबासाहेब ढाकणे, शिवाजी फड, अशोक चाटे, सारं

MB NEWS:शिक्षक मतदार संघात परिवर्तन अटळ;सुर्यकांत विश्वासराव यांचाच विजय निश्चित - बंडू अघाव

इमेज
  शिक्षक मतदार संघात परिवर्तन अटळ;सुर्यकांत विश्वासराव यांचाच विजय निश्चित - बंडू अघाव विश्वासरावांच्या विजयाचे शिल्पकार व साक्षीदार व्हा - अनुप कुसूमकर  परळी / प्रतिनिधी राज्यातील आजी-माजी शासन कर्त्यांच्या शिक्षक व शिक्षण विरोधी धोरणामुळे तसेच निषक्रीय आमदारामुळे शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्याऐवजी ते वरचेवर क्लिष्ट होत गेले. त्यामुळे  शिक्षक, प्राध्यापकांमध्ये प्रचंड असंतोष असून यावेळी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात परिवर्तन अटळ आसून मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांचा विजय निश्चित आसल्याचे मत मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी व्यक्त केले तर सुर्यकांत विश्वासराव यांना पहिल्या पंसतीची मते देऊन या विजयाचे शिल्पकार व साक्षीदार बनण्याचे आवाहन परळी तालुका अध्यक्ष अनुप कुसूमकर यांनी केले.       औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची 30 जानेवारी रोजी निवडणुक होत आसून या निवडणुकीत मराठवाडा शिक्षक संघाने संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांना अधिकृत उमेदवारी दिली आसून त्यांच्या प्रचारानिमित्त परळी शहरातील विविध शाळा/मह

MB NEWS:२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तपासणी; डॉ.कृष्णा ढेकळे यांचा पुढाकार

इमेज
  पौळ पिंपरी जि.प.शाळेत मुलांची दंत आरोग्य तपासणी २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तपासणी; डॉ.कृष्णा ढेकळे यांचा पुढाकार परळी (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे विद्यार्थ्यांची दंत आरोग्य तपासणीचे शिबीर घेण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि पिंपरीचे भूमिपुत्र डॉ.कृष्णा ढेकळे यांनी यासाठी पुढाकार घेवून मुलांची तपासणी केली. ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा पौळ पिंपरी येते मुलांची दंत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन संपन्न झाले. कार्यक्रमास सरपंच माणिकराव पौळ, उपसरपंच गणेश आबा पौळ, शालेय समितीचे माजी अध्यक्ष बबनराव पौळ, पत्रकार दत्तात्रय काळे, परळी ग्रामिण पोलिस स्टेशनचे एस.पी.केंद्रे, शाळेचे मुख्याध्यापक दिपक गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे, उपाध्यक्ष युवराज पौळ यांची प

MB NEWS:किसान सभेच्या ट्रॅक्टर मोर्चानी परळी शहर दणानले

इमेज
  केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात- कॉ अजय बुरांडे किसान सभेच्या ट्रॅक्टर मोर्चानी परळी शहर दणानले परळी वै ता.२५ प्रतिनिधी      केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. जोपर्यंत हमी भावाचा कायदा होत नाही तोपर्यंत संयुक्त किसान मोर्चा देशभवर वेगवेगळे आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारने संयुक्त किसान मोर्चाला दिलेले लेखी आश्वासनाची आठवन करूण देण्यासाठी ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला असल्याचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांनी सांगीतले.      संयुक्त किसान मोर्चानी केलेल्या आवाहानानुसार बुधवारी (ता.२५) किसान सभेनी परळी तहसिल कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. परळी तहसिलवर पहिल्यांदाच ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. दीडपट हमी भावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्रीय वीज विधेयकाची वापसी, पेन्शन, पीक विमा देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, व, अपूर्ण कर्जमुक्ती तसेच बीड जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपातील ताफवती व अपारदर्शकता.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड कर

MB NEWS:बागेश्वर धामवाले बाबा धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांची क्लिन चीट, म्हणाले आम्ही सगळे व्हिडिओ पाहिले पण…

इमेज
  बागेश्वर धामवाले बाबा धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांची क्लिन चीट, म्हणाले आम्ही सगळे व्हिडिओ पाहिले पण… नागपूरः  बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री  Dhirendra Shastri ) उर्फ बाहेश्वर बाबा ( Bageshwar baba ) यांनी नागपुरात येऊन कोणतंही अंधश्रद्धा पसरवणारं विधान केलं नाही, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असून असे अंधश्रद्धाविषयक अथवा चमत्कारांचे दावे करणाऱ्या व्यक्तीविरोधात तत्काळ कारवाई केली जाऊ शकते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी बागेश्वर बाबा यांच्या नागपुरातील एका कार्यक्रमातील वक्तव्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर कार्यक्रमांतील व्हिडिओ खंगाळून काढले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यांना लागू होत नाही, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. काय म्हणाले पोलीस आयुक्त? श्याम मानव यांच्या तक्रारीला उत्तर देताना नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘ नागपुरातले 8 जानेवारीचे

MB NEWS:शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड

इमेज
  शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी), :- दि.२४ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी विभागीय परीक्षेतून कातकडे शिवराज विश्वांभर यांची सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर निवड झाली. कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाल्याबद्दल सर्वसाधारण अभिनंदन होत आहे.          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची  निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी  या विभागीय परीक्षेतून सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाली आहे.  कातकडे शिवराज विश्वांभर  , रा.कातकरवाडी, कातकरवाडी ,या छोट्याशा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण व बडवणी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले..परभणी येथे DTed चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. जिद्द आणि चिकाटीने वाटचाल केली की आकाशालाही गवसणी घालता येते. तसेच आपल्या

MB NEWS:एकाच घरातले ‘ते’ 7 मृतदेह, गूढ उकललं!! भयंकर हत्याकांड, आरोपींची कबुली..

इमेज
  एकाच घरातले ‘ते’ 7 मृतदेह, गूढ उकललं!! भयंकर हत्याकांड, आरोपींची कबुली.. पुणे :  भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह  आढळल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. या भयंकर घटनेमागचं नेमकं कारण समोर आलं आहे. कुटुंबियांनी ही आत्महत्या केली असावी असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र सखोल तपासाअंती  पोलिसांनी या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं उघड झालं आहे. कुटुंबियांच्या नातेवाईकांनीही हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.  विशेष म्हणजे या प्रकरणी आरोपींनी या घटनेची कबुलीही दिली आहे. आरोपींच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच पोलीस अधिकारी यासंदर्भात  पत्रकार परिषद घेणार आहेत. घटनेचं गूढ उकललं… दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं कारण उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून त्यांनी या भयंकर कृत्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सदर कुटुंबियां

पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद

इमेज
  पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद 'परिक्षा पे चर्चा' उपक्रमातंर्गत परळीत चित्रकला स्पर्धा ; हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या टीमने केली स्पर्धा यशस्वी* परळी वैजनाथ ।दिनांक २५। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'परिक्षा पे चर्चा ' या उपक्रमांतर्गत शहरात आज पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी प्रगतीपथावरील भारत आपल्या उत्तमोत्तम चित्रातून रेखाटला.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सर्वत्र शाळा व महाविद्यालय स्तरावर  'परिक्षा पे चर्चा' हा उपक्रम घेण्यात येत आहे. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनानुसार आज शहर व मतदारसंघात देखील हा उपक्रम राबविण्यात आला, त्याअंतर्गत शहरातील विविध दहाहून अधिक शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आझादी का अमृतमहोत्सव, सर्जि

MB NEWS:धक्कादायक : एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह तलावात सापडले

इमेज
  धक्कादायक : एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह तलावात सापडले गेवराई तालुक्यातील एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. बदलत्या काळात आतंरधर्मीय, आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र, अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार… दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज मंगळवारी, 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय 45 वर्षे, दोघे रा. खामगाव, ता.गेवराई) त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी श्यामराव

MB NEWS:राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी चे प्रभावी माध्यम : डॉ रमेश गटकळ*

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी चे प्रभावी माध्यम : डॉ रमेश गटकळ सिरसाळा (प्रतिनिधि):- मौजे जयगाव या ठिकाणी १७ जानेवारी पासून सुरू असलेले *विशेष युवक युवती शिबिराची* २३ जानेवारी रोजी समारोप झाला. समारोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच पी कदम उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते डॉ. रमेश गटकळ (श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव), तसेच श्री  डॉ. अमोल गंगणे (वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने कठोर मेहनत करणे गरजेचे आहे. हेच यशस्वी होण्याचे सूत्र आहे आसे प्रतिपादन डॉ. अमोल गंगणे यांनी व्यक्त केले.   माणसाने आपल्या आनंदी जीवन जगण्याची दिशा स्पष्ट केली पाहिजे जी इतरांना देखील आनंद देणारी असावी. हे सांगताना डॉ. रमेश गटकळ यांनी "बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण॥  खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥" तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण करून दिली. त्यांनी आपले

MB NEWS:ग्लोबल आडगाव चित्रपटाची पुन्हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

इमेज
  ग्लोबल आडगाव चित्रपटाची पुन्हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड  सिलव्हर ओक फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रख्यात  सिने लेखक-दिग्दर्शक अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित  मनोज कदम निर्मित व अमृत मराठे सहनिर्मित,  बहुचर्चित ग्लोबल आडगाव चित्रपटाची निवड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.दि.२ते ९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पुणे येथे हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे. 'ग्लोबल आडगाव' हा बहुआयामी लेखक आणि पुरस्कार विजेते व्यक्तिमत्व डॉ.अनिलकुमार साळवे दिग्दर्शित एक बिग-बजेट चित्रपट आहे. अभिनेता प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.   'ग्लोबल आडगाव' हा चित्रपट कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. तसेच अधिकृतपणे न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिका साठी निवडला आहे.या चित्रपटास देश-विदेशातील नामवंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या अजंता_एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशोक कानगुडे याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा ज