MB NEWS:आज ४ वा. विजेवरील इंजिनाची चाचणी: परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण

 आज ४ वा. विजेवरील इंजिनाची चाचणी: परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

            दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे.आता आज दि.२७ जानेवारी राेजी दुपारी  ४ वा.विद्युतीकरणाची तपासणी करून विजेवरील इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे.



    
   परळी ते पोखर्णी नृसिंह दरम्यानच्या रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे  सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विजेवरील इंजिनाची चाचणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात परळी ते पोखर्णी नृसिंह मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची चाचणी केली जाणार आहे.

प्रथमच  विजेचे इंजिन धावणार

        प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर पथकाकडून तपासणी केली जाईल. वीजपुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची तपासणी केली जाते. अनावश्यक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही ना, याची चाचपणी केली जाते. त्यानंतर विजेचे इंजिन चालवले जाईल. विजेच्या तारा तांब्याच्या असल्याने चोरी होण्याची शक्यता लक्षात घेता चोवीस तास वीजपुरवठा सुरू ठेवला जाताे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!