MB NEWS:नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र

 नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र 



सिरसाळा (प्रतिनिधि):- येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय ,जनविकास महाविद्यालय बनसारोळा, वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर, कै.  रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमान *राज्यस्तरीय नवीन शैक्षणिक धोरण 2020* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन दि. २५ जाने. २०२३ रोजी करण्यात आले होते. 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूराव भुसारे हे होते, उद्घाटक मा. भगवानराव मोहिते, मा. रामेश्वर कदम हे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी एन मोरे हे होते. तर विशेष उपस्थितीत प्राचार्य डॉ. अरुण दळवे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व प्राचार्य डॉ. एच पी कदम हे होते. सर्वप्रथम श्री पंडितगुरु पार्डीकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांनच्या हस्ते करण्यात आले आणि मतदार जन जागृती शपथ घेण्यात आली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. डी एन मोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे हे सर्वांच्या समोर मोठे आव्हान आहे, या धोरणामुळे शिक्षणातील टप्पे बदलले असून त्यांचे सकारात्मक परिणाम समाजावर होतील असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षण धोरणाची उद्दिष्टे व समस्या यावर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप रामेश्वर कदम यांनी केला तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले सूत्रसंचालन प्रा. धनवे व्ही एस यांनी केले, तर आभार डॉ. ए व्हीं जाधव यांनी मानले.

या चर्चा सत्राच्या दुसऱ्या सत्रात डॉ आर टी बेद्रे (संचालक, एचआरडीसी हरीसिंग गौर विद्यापीठ सागर) यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे आव्हाने व उपाय योजना यावर सविस्तर मार्गदर्शन करताना प्राचीन काळातील शैक्षणीक धोरण त्यातील काळानुसार बदलत गेलेल्या शैक्षणीक संकल्पना त्यांची गरज व महत्त्व व आजची नविन परिस्थिती व नविन संकल्पना यावर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. अरुण दळवे यांनी केला तर आभार प्राचार्य डॉ. एच पी कदम यांनी मांडले सूत्रसंचालन डॉ जे वी तुडमे यांनी केले. या चर्चासत्रास प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार