परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:आज विजेवरील इंजिनाची अंतर्गत तपासणी तर दि.29 रोजी परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गावर अधिकृत चाचणी

 आज विजेवरील इंजिनाची अंतर्गत तपासणी तर दि.29 रोजी परळी ते पोखर्णी नृसिंह  आणि परळी ते लातूररोड मार्गावर अधिकृत चाचणी




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
            दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे.आता आज दि.२७ जानेवारी राेजी दुपारी  ४ वा.विद्युतीकरणाची अंतर्गत तपासणी करून विजेवरील इंजिनाची दि.29 रोजी चाचणी घेतली जाणार आहे.
       परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड दरम्यानच्या रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे  सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विजेवरील इंजिनाची अंतर्गत चाचणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड  मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची चाचणी दि.29 रोजी केली जाणार आहे.

प्रथमच विजेचे इंजिन धावणार

        प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर पथकाकडून तपासणी केली जाईल. वीजपुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची तपासणी केली जाते. अनावश्यक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही ना, याची चाचपणी केली जाते. त्यानंतर विजेचे इंजिन चालवले जाईल. विजेच्या तारा तांब्याच्या असल्याने चोरी होण्याची शक्यता लक्षात घेता चोवीस तास वीजपुरवठा सुरू ठेवला जाताे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार चाचणी
     दरम्यान दिनांक 29 रोजी डिझेल इंजिन व विद्युत इंजिनाची प्रत्यक्ष चाचणी व तपासणी करण्यात येणार आहे यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तांत्रिक विभागाचे अधिकारी विद्युत विभागाचे अधिकारी कंट्रोल रूम सबस्टेशनचे अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!