इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:■संविधान हाच धर्मग्रंथ -माजी न्यायमूर्ती तिडके

 ■संविधान हाच धर्मग्रंथ -माजी न्यायमूर्ती तिडके





परळी / प्रतिनिधी


सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या भारत देशात संविधान हाच सर्वांचा धर्मग्रंथ तर जनगणमन हीच सर्वांची प्रार्थना आहे असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी.आर. तिडके यांनी केले.मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन परळी तालुक्यातील मोहा येथे महाराष्ट्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संकुलात मोठ्या हर्ष उल्हास साजरा करण्यात आला महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे, सखाराम शिंदे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सेवा सोसायटीचे कर्मचारी, विद्यार्थी, पालक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना मा. न्यायमूर्ती तिडके म्हणाले ते देशाचा कारभार सुयोग्य पद्धतीने चालावा या करिता मोठ्या मेहनतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान अर्थानं घटना लिहिली. प्रस्तावना,कलम आणि अनुसूची हे आपल्या संविधानाचे तीन भाग असून प्रस्तावनेला संविधानाची उद्देशिका म्हणतात.विद्यमान काळात शासन कर्ते हेच संविधान व घटना बाह्य काम करीत आहेत.संविधान कलम 13 नुसार अनिष्ठ रूढी परंपरा नष्ट करणे आवश्यक असताना शासन कर्ते मात्र अनेक ठिकाणी भूमिपूजन, शासकीय पूजा करताना दिसतात.कलम 14 ही समतेची असून राजकीय मंडळी निवडणुकीत जाती-धर्माचा भेदभाव करून घटनेची पायमल्ली करतात. संविधानाच्या कलम 32 नुसार मूलभूत हक्क सर्वाना असून यात ही शासन कर्ते  सर्वसामान्यांचे मूलभूत हक्क हिरावून घेत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.


या ध्वजारोहण प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना विविध देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक विनायक राजमाने, प्रास्तविक मुकुंद चौधरी तर आभार व्यक्त हनुमंत वाघमोडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या