MB NEWS:भीमा नदीपात्रात मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच, त्या सात मृतदेहानंतर पुन्हा एक मृतदेह सापडला

 भीमा नदीपात्रात मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच, त्या सात मृतदेहानंतर पुन्हा एक मृतदेह सापडला



नागरगाव (ता.शिरूर) येथे भीमानदीकाठी दि.२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा या भागात मृतदेह आढळून येण्याचे सत्र सुरुच आहे. हा मृतदेह पारगाव सा.मा.येथील व्यक्तीचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आधी १८ ते २४ जानेवारी या काळात भीमानदीपात्रात दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. संबंधित मयत व्यक्तींचा खुन करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून आजपर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असुन बदला घेण्यासाठी हे खुन झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भीमानदीकाठी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे.  या घटनेमुळे पुन्हा एकदा भीमानदीकाठ चर्चेत आला आहे. घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !