MB NEWS:शिक्षक मतदार संघात परिवर्तन अटळ;सुर्यकांत विश्वासराव यांचाच विजय निश्चित - बंडू अघाव

 शिक्षक मतदार संघात परिवर्तन अटळ;सुर्यकांत विश्वासराव यांचाच विजय निश्चित - बंडू अघाव



विश्वासरावांच्या विजयाचे शिल्पकार व साक्षीदार व्हा - अनुप कुसूमकर 


परळी / प्रतिनिधी


राज्यातील आजी-माजी शासन कर्त्यांच्या शिक्षक व शिक्षण विरोधी धोरणामुळे तसेच निषक्रीय आमदारामुळे शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्याऐवजी ते वरचेवर क्लिष्ट होत गेले. त्यामुळे  शिक्षक, प्राध्यापकांमध्ये प्रचंड असंतोष असून यावेळी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात परिवर्तन अटळ आसून मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांचा विजय निश्चित आसल्याचे मत मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी व्यक्त केले तर सुर्यकांत विश्वासराव यांना पहिल्या पंसतीची मते देऊन या विजयाचे शिल्पकार व साक्षीदार बनण्याचे आवाहन परळी तालुका अध्यक्ष अनुप कुसूमकर यांनी केले.      


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची 30 जानेवारी रोजी निवडणुक होत आसून या निवडणुकीत मराठवाडा शिक्षक संघाने संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांना अधिकृत उमेदवारी दिली आसून त्यांच्या प्रचारानिमित्त परळी शहरातील विविध शाळा/महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांच्या भेटी दरम्यान  त्याच्यांसी संवाद साधताना अघाव व कुसूमकर यांनी वरीलप्रमाणे अवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत संघटनेचे श्रीहरी दहिफळे,परवेज देशमुख,खय्युम शेख, बालासाहेब जाधव, श्रीधर गुट्टे, संजय गोरे, अलिशान काजी,शिवाजी शिंदे, दिपक अघाव, अनंत मुंडे, राजाभाऊ नागरगोजे,विठ्ठल पुंडकरे, राजेश्वर निला, एकनाथ लांडगे,बापुराव खोतपाटील, ज्ञानोबा गडदे आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार