MB NEWS:शहरातील वैद्यनाथ बँक कॉलनी भागात शहर पोलिसांनी पेट्रोलिंगची गस्त वाढवावी : विशाल मुंडे

  वैद्यनाथ बँक कॉलनी भागात शहर पोलिसांनी पेट्रोलिंगची गस्त वाढवावी : विशाल मुंडे




परळी प्रतिनिधी : परळी शहरातील परळी अंबाजोगाई रोडवरील वैजनाथ बँक कॉलनीत गेली अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढत असल्याने शहर पोलिसांनी पेट्रोलिंग ची गस्त वाढवावी अश्या  मागणीचे निवेदन आज परळी शहर पोलिसांना भाजपचे युवा नेते विशाल मुंडे यांनी दिले आहे.


सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील वैजनाथ बँक कॉलनी भागात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून, दिनांक 24 जानेवारी रोजी मध्यरात्री वैजनाथ बँक कॉलनी येथील सोडगीर यांच्या घराच्या चैनल गेटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न तीन ते चार चोरट्यांनी केला मात्र आजूबाजूच्या लोकांना लागलीच जाग आल्याने नागरिकांनी आरडा ओरड केली त्यामुळे चोरांनी तेथून लागलीच पोबारा केला तरी या कारणास्तव शहर पोलिसांनी बँक कॉलनी भागातील सर्वच भागांमध्ये व विशेषत वैजनाथ गॅस गोडाऊन च्या मागील बाजूस पेट्रोलिंग गस्त वाढवून नागरिकांना सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे युवा नेते विशाल मुंडे यांनी परळी शहर पोलिसांना दिले असून, या निवेदनावर  बाबासाहेब ढाकणे, शिवाजी फड, अशोक चाटे, सारंग बदने,बंडू भांड, ,नारायण फड, संजय पाटोळे, भागवत शेप, मनोज भास्कर, भानुदास मुंडे, बि डी भास्कर, वेदांत मुंडे, बाळासाहेब मुंडे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार