इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: आ.धनंजय मुंडे यांचे हात बळकट करा: आ.विक्रम काळे यांना प्रथम पसंतिचे मत देऊन विजयी करा-प्रदीप खाडे

  आ.धनंजय मुंडे यांचे हात बळकट करा: आ.विक्रम काळे यांना प्रथम पसंतिचे मत देऊन विजयी करा-प्रदीप खाडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे जिव्हाळ्याचे सहकारी आ.विक्रम काळे यांना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व आ. धनंजय मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रथम पसंतिचे मत देऊन पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन अध्यक्ष कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्था व नाथ शिक्षण संस्थेचे सह सचिव प्रदीप खाडे यांनी केले आहे. 

          महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक - २०२३ साठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवार तसेच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आ.धनंजय मुंडे  यांचे जिव्हाळ्याचे सहकारी आ.विक्रम काळे यांना सर्वाधिक मतदधिकय परळी मतदारसंघतील शिक्षक मतदार बांधवयांनी देऊन विजयी करावे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत.  शिक्षण क्षेत्राचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व आहेत. मागील सलग तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना आ. विक्रम काळे यांनी या मतदार संघातील शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी आवाज उठवलेला असून, न्याय देण्याचे काम केलेले आहे.  शिक्षकांना त्यांचे प्रश्न सोडवनारा हक्काचा माणूस बप्पाच्या रूपाने सरकार मध्ये लाभणार आहे.      

        राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आ.धनंजय मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा शिक्षक विधान परिषद निवडणूकीत शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे आ. विक्रम काळे हे महाविकास आघडीचे उमेदवार असून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल असतात. या निवडणूकीत परळी मतदार संघात प्रचाराचे रान उठविले असून विजय आपला निश्चितच आहे, आता केवळ पसंती क्रमांक 1 अशी नोंद करून या विजयावर शिक्कामोर्तब करायचे आहे असेही श्री. प्रदीप खाडे म्हणाले. या निवडणूकीत आ.विक्रम काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांच्या विजयात परळीसह आपल्या बीड जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक असावा या दृष्टीकोनातून त्यामुळे सुज्ञ शिक्षक मतदार बंधु-भगिनींनी उच्चशिक्षित व अतिशय अभ्यासु  असलेल्या आ.विक्रम काळे यांना पसंती क्रमांक एक देऊन प्रचंड मताने निवडून देऊन सभागृहात पाठवावे  असेही आवाहन प्रदीप खाडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!