MB NEWS:वसंतनगर परिसरातील 'अंधारखोळी' वनविभाग जमीनवर पंधरा लाख लिटर साठवण क्षमतेच्या जलकुंभ चारशे हाताच्या श्रमदानातून तयार

 वसंतनगर परिसरातील 'अंधारखोळी' वनविभाग जमीनवर पंधरा लाख लिटर साठवण क्षमतेच्या जलकुंभ चारशे हाताच्या श्रमदानातून तयार





परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर , सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  सात दिवशीय शिबिर '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' ही संकल्पनावर घेऊन जल सक्षारता संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा , पर्यावरण आकलन आचरण आणि श्रमदानातून दोनशे युवक - युवतीच्या चारशे हातानी, सात दिवस सलग  आठ तास श्रमदानतून पन्नास तासात अंधार खोळी  परिसर वनविभाग डोंगऱ्याच्या कुशीत हा जलकुंभ पाझर तलाव श्रमदान तयार केला . हा उपक्रम संकल्पना रा . से . यो. संयोजक  प्रा . डॉ . माधव रोडे, व सखाराम नाईक ज्युनिअर कॉलज प्राचार्य अरूण पवार ,  सरपंच विजय राठोड यांच्या राबविली .  

वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम यांच्या हस्ते श्रमदानस प्रारंभ झाला . तसेच अंकुर बीज बँक स्थापना प्राचार्य अरूण पवार यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमास   संपन्न . प्रा . उत्तम कांदे,कार्यक्रमधिकारी प्रा . डॉ . भीमानंद गजभारे, प्रा . दिलीप गायकवाड  नवनाथ घुले, मुख्यापक राम राठोड आदि उपस्थितीत होते . अंकुर बीज बँक मध्ये प्रा . माधव रोडे यांच्या नेतृत्वा खाली पळस, लिंब, अंबा, गुलमोहर, सिताफळ आदि च्या आठ हजार बीज जमा केले असून त्याची रोपटे मुले तयार करत असून ती सर्व या परिसरात सामुहिक श्रमदानतून लावण्यात येणार आहेत . हे सर्व बीज संकल्न महाविद्यालय व शालेय मुलांनी  केले आहेत असुन .श्रमदानतून जो जलकुंभ उभा करण्यात आला आहे तो ज्या दोन वनविभाग डोंगराच्या कुशीत आहे त्या डोंगरा अंकुर बीज बॅंकेतील बीज रोपणाचा कार्यक्रम येणाऱ्या जुनच्या पावसाळ्यात राबविण्यात येणार आहे . या श्रमदान शिबिराच्या  कार्यक्रमाचे आयोजन प्रा . माधव रोडे यांनी केले, शिबिरात स्वामी ओंककार सर, बालासाहेब नागरगोजे सर, केशव गीत्तेसर, संतोष पेद्देवाड, आविनाश जाधव, गणेश परळीकर, आण्णासाहेब राठोड, बाळासाहेब देशमुख, विजय सुंरनार , भारत जगताप, वैजनाथ भालेराव, अनिल जाधव, बोबडे श्रीकांत, बाळेकर , गोंविद पाळेकर, वाघमारे रामदास, प्रा . उमाकांत कुरे, प्रा . मारूती मोकळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागचे स्वंयसेवक विद्यार्थी विवेक आघाव, साक्षी गंगाधरे, विश्वजीत हाके, राम फड, शैलेश दौंड, सेजल मंत्री, आरती शिंदे, अभिजीत रोडे, संध्या रोडे, आरबज पठाण, सुध्दोधन प्रधान, सय्यद रोणक, रोहीत शिंगारे, कृष्णा रोडे, सोमनाथ मुंडे आदींनी परिश्रम केले .

.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !