दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS: कै.शंभुदेव ढाकणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ७ वी वर्गात प्रथम विद्यार्थ्याला २१०० रू पारितोषिक केले जाहीर

 कै.शंभुदेव ढाकणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ७ वी वर्गात प्रथम विद्यार्थ्याला २१०० रू पारितोषिक केले जाहीर



परळी वैजनाथ, प्रतिनिधी
          गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य अंजली दत्ताजी ढाकणे यांनी सातवी वर्गात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 2100 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
       आज ७४ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त अस्वलअंबा ग्रामपंचायत व जि.प उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहणास सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व  विद्यार्थी व शिक्षकांसह गावातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते . यावेळी ग्राम पंचायत सदस्य अंजली दत्ताजी ढाकणे यांनी  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कै.शंभुदेव ढाकणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इयत्ता  ०७ वी च्या वर्गातील सर्वात हुशार गुणसंपन्न विद्यार्थ्यास २१०० रू बक्षीस देण्याचे जाहीर केले.हे बक्षीस प्रतिवर्षी १५ आॕगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी देण्यात येईल . या सुरू केलेल्या नविन उपक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त पणे स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....