MB NEWS:२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तपासणी; डॉ.कृष्णा ढेकळे यांचा पुढाकार

 पौळ पिंपरी जि.प.शाळेत मुलांची दंत आरोग्य तपासणी


२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तपासणी; डॉ.कृष्णा ढेकळे यांचा पुढाकार


परळी (प्रतिनिधी)

तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे विद्यार्थ्यांची दंत आरोग्य तपासणीचे शिबीर घेण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि पिंपरीचे भूमिपुत्र डॉ.कृष्णा ढेकळे यांनी यासाठी पुढाकार घेवून मुलांची तपासणी केली. ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा पौळ पिंपरी येते मुलांची दंत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन संपन्न झाले. कार्यक्रमास सरपंच माणिकराव पौळ, उपसरपंच गणेश आबा पौळ, शालेय समितीचे माजी अध्यक्ष बबनराव पौळ, पत्रकार दत्तात्रय काळे, परळी ग्रामिण पोलिस स्टेशनचे एस.पी.केंद्रे, शाळेचे मुख्याध्यापक दिपक गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे, उपाध्यक्ष युवराज पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.कृष्णा ढेकळे हे जि.प.शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. मुंबई येथे त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सिरसाळ्यासारख्या ग्रामिण भागात रूग्णांची सेवा सुरू केलेली आहे. शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी येथील शाळेत विद्यार्थ्यांची दंत आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. दातांची निगा कशी राखावी? याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक सर्वश्री चिंते, शिवनगे, पठाण, सौ.दासूद, सौ.काळे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !