MB NEWS:पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना पुरस्कार जाहीर

 पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना  पुरस्कार जाहीर




प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Padma Awards 2023: केंद्र सरकारने 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  सन 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 106 पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब करत मंजूरी दिली आहे. यंदाच्या वर्षी एकूण 106 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा एकूण 19 महिलांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे. यापैकी परदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीपी या श्रेणीमध्ये दोन पद्म विजेत्यांचा समावेश आहे. तर 7 मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश या यादीमध्ये आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्री दीपकजी धर, श्री कुमारजी मंगलम बिरला, डॉ. श्री परशुरामजी खुणे,श्री प्रभाकरजी मांडे, श्री गजाननजी माने, स्व. राकेशजी झुनझुनवाला, श्री कुमीजी वाडिया, रविनाजी टंडन यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन. राष्ट्रासाठी व महाराष्ट्रासाठी या दिग्गजांचे योगदान कायमच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार