MB NEWS:किसान सभेच्या ट्रॅक्टर मोर्चानी परळी शहर दणानले

 केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात- कॉ अजय बुरांडे

किसान सभेच्या ट्रॅक्टर मोर्चानी परळी शहर दणानले


परळी वै ता.२५ प्रतिनिधी


     केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. जोपर्यंत हमी भावाचा कायदा होत नाही तोपर्यंत संयुक्त किसान मोर्चा देशभवर वेगवेगळे आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारने संयुक्त किसान मोर्चाला दिलेले लेखी आश्वासनाची आठवन करूण देण्यासाठी ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला असल्याचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांनी सांगीतले.

     संयुक्त किसान मोर्चानी केलेल्या आवाहानानुसार बुधवारी (ता.२५) किसान सभेनी परळी तहसिल कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. परळी तहसिलवर पहिल्यांदाच ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. दीडपट हमी भावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्रीय वीज विधेयकाची वापसी, पेन्शन, पीक विमा देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, व, अपूर्ण कर्जमुक्ती तसेच बीड जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपातील ताफवती व अपारदर्शकता.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या मागण्यांसाठी या संयुक्त किसान मोर्च्यांने यासारखे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी बुधवारी (ता.२५) किसान सभेनी परळी तहसिलवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर सह मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ भगवान बडे, माकपचे कॉ पी एस घाडगे, सिटु चे कॉ बी जी खाडे, कॉ गंगाधर पोटभरे, कॉ विष्णु देशमुख, कॉ बालासाहेब कडभाने यांच्यासह किसान सभेचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते.

Video 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !