MB NEWS:२५ किलो गांजा पकडला; पोलिसांची कामगिरी

 २५ किलो गांजा पकडला; पोलिसांची कामगिरी 




गेवराई.....

शहरालगत असणा-या बाह्यवळण रस्त्या जवळ एका हॉटेल मध्ये २५ किलो गांजा विक्रीसाठी येत आहे अशी माहिती गुप्त खब-या मार्फत गेवराई पोलिसांना मिळाली व तात्काळा वरिष्ठ अधिकारी यांचे पथक घटनास्तळावर दाखल झाले व हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली असता त्या ठिकाणी २५ किलो गांजा सापडला व एकाला गेवराई पोलिसांनी जेरबंद केले असुन त्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे.

   गौसखान अमनउल्ला खान  वय ४५ वर्ष राहणार गेवराई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन बुधवार रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास गेवराई पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांना गुप्त खब-या मार्फत माहिती मिळाली कि येथील बाह्यावळण रस्त्या जवळ एका हॉटेलवर २५ कीलो गांजा विक्रीसाठी येत आहे.यावर तात्काळ पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार व प्रफूल्ल साबळे हे आपल्या सहकारी यांना घेऊन घटनास्थळी जाऊन छापा मारला असता यामध्ये २५ किलो गांजा नावाचा आम्लपदार्थ मिळून आला. तसेच वरील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या फिर्यादी वरून एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उप अधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार,सहायक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे ,नितीन राठोड ,राजू भिसे,कृष्णा जायभाये,विठ्ठल राठोड,संजय राठोड यांनी केली. याचा पुढील तपास उपनिरीक्षक तुकाराम बोडके हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार