पोस्ट्स

परळीची निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

इमेज
  श्री संताजी महाराजांच्या नावाने नवीन सभागृह बांधून देणार धनंजय मुंडे यांचा तेली समाजाला शब्द परळीची निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, शनी मंदिराच्या उर्वरित बांधकामाचेही काम मीच करणार - मुंडेंचा शब्द परळी वैद्यनाथ (दि. 31) - परळी शहरांमध्ये विविध समाजातील लोक आनंदाने व एकोप्याने राहतात. विविध, सण उत्सव महापुरुषांची जयंती पुण्यतिथी यासारखे कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येक समाजाला स्वतःचे स्वतंत्र सभागृह देण्याचा मी आजवर प्रयत्न केला आहे. तेली समाजाला सुद्धा श्री संताजी महाराजांच्या नावाने सर्व सोयी युक्त असे सभागृह बांधून देणार असल्याचा शब्द धनंजय मुंडे यांनी तेली समाजाच्या सोबत आयोजित बैठकीमध्ये दिला आहे.  परळीकरांना मागील निवडणुकीत दिलेले सर्वच्या सर्व शब्द पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यातून अनेक विकास कामे झाली आहेत तसेच अनेक विकास कामे प्रगतीपथावर असून काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे कुणी कितीही आरोप करून मला एकटे पाडण्याचा किंवा घेरण्याचा प्रयत्न केला तरी मी परळीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे, शनी मं

आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

इमेज
  आता माघार घेऊ नका, राजेभाऊ तुम्ही लढाच! परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या परळी मतदारसंघातील जनतेचा राजेभाऊ फड यांना आग्रह परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी विधानसभा मतदारसंघात विकास घडवून आणायचा असेल आणि मतदारसंघातील वातावरण निर्भय आणि सर्वधर्म समभावाचे बनवायचे असेल तर त्यासाठी परिवर्तन घडवावे लागेल. त्यासाठी युवक नेते राजेभाऊ फड हे सक्षम उमेदवार आहेत अशी जनसामान्यांच्या मनात भावना निर्माण झाल्याने मतदारसंघातून फड यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. निवडून येण्यास ते सक्षम उमेदवार असून त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह मतदरांतून केला जात आहे. त्यांनी कुठल्याही स्थितीत माघार न घेता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढवावी असा आग्रह परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या मतदार बांधवांतून केला जात आहे. परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होईल असे चित्र निर्माण झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना तगडी लढत देऊ शकेल असा एकमेव उमेदवार राजेभाऊ फड आहेत अशी जनतेत भावना आहे. विकासाची सकारात्मक दृष्टी, उद्योग व्यापारातील त्यांचे संबंध यामुळे ते या मतदारसंघात रोजगार निर्मिती दे

प्राचार्या डॉ.विद्याताई देशपांडे -देशमुख यांच्या कार्यकाळातील पहिले उत्तुंग यश !

इमेज
  आनंदवार्ता :  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास नॅक ' चा 'बी' दर्जा प्राप्त परळी वैजनाथ दि.३१ (प्रतिनिधी)       येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास 'नॅक' चा 'बी ' दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाने 'नॅक'च्या मूल्यमापनात तिसऱ्यांदा हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. तृतीय मूल्यमापनासाठी ' नॅक' च्या त्रिसदस्यीय समितीच्या तज्ज्ञांनी दि २२ व २३ऑक्टोबर  रोजी महाविद्यालयास भेट दिली होती.     या समितीत डॉ जितेनकुमार सोनी ( माजी कुलगुरु सौराष्ट्र विद्यापीठ , गुजरात) हे समितीच्या अध्यक्षस्थानी होते तर डॉ.वासंती ताटिमाकुला (योगी वेन्नम्मा विद्यापीठ कडापा,आंध्रप्रदेश) व डॉ . पार्वती रुद्रप्पा(व्ही इ टी फर्स्ट ग्रेड  कॉलेज,बेंगलोर - कर्नाटक ) यांनी सदस्या म्हणून काम पाहिले.त्यांच्या या दोन दिवसीय  भेटीत त्यांच्याद्वारा महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी केली गेली.त्यात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम , समाजोपयोगी घेतलेली भूमिका ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य,कार्यालयीन कामकाज,ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा विविध वि

कोणत्या उमेदवारांनी अर्ज घेतले मागे?

इमेज
  परळी विधानसभा मतदार संघ : दोन जणांनी अर्ज घेतले मागे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या दिसून येत असून  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 58 उमेदवारांचे 72 अर्ज दाखल झाले होते. दि. 30 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये एकूण 58 पैकी 10 अर्ज छाननीत बाद झाले तर 48 अर्ज वैध झाले. आज दि.31 रोजी दोन जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.चार नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.     विष्णु नामदेव राठोड अपक्ष इनाम तांडा, गोवर्धन हिवरा ता. परळी वै. जिल्हा बीड व साहेबराव नामदेवराव जाधव अपक्ष शाहूनगर, बीड या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.अशी माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 233- परळी विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.         

प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर: पक्षाकडून कार्यकर्त्यांना केलं आवाहन

इमेज
प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर: पक्षाकडून कार्यकर्त्यांना केलं आवाहन       वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रक काढत माहिती दिली. गुरुवारी, ३१ ऑक्टोबरला पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.        प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत वंचितच्या अधिकृत एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली. ” बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकर कुटुंब यावेळी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. त्यामुळे आपणास विनंती आहे की कुटुंबाच्या विनंतीचा आदर करावा कारण ते कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. “पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभाग यां

नागरी समस्या सोडवण्यासाठी कार्यालय होणार कार्यान्वित

इमेज
श्रीकृष्ण मिञमंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्घाटन - राजकुमार डाके              परळी ( प्रतिनीधी ) शहरातील कृष्णानगर परिसरात नागरी समस्या सोडवण्यासाठी व सामाजीक, सांस्कृतीक,  शैक्षणीक चळवळ वाढीस लागण्यासाठी गेल्या बावीस वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भाऊबीजेच्या शुभमुहुर्तावर रविवार दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी अनेक मांन्यवरांच्या प्रमुख ऊपस्थीतीत करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकृष्ण मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार डाके यांनी दिली आहे.      अनेक नागरी समस्यांना वाचा फोडुन वेळप्रसंगी जनआंदोलन उभारुन श्रीकृष्ण मिञ मंडळाच्या माध्यमातून प्रभागातील अनेक समस्या सोडवण्यात आल्या आहेत.सामाजीक  सांस्कृतीक व शैक्षणीक चळवळ गतीमान करण्याचे कार्य करत श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमीत्त दहिहंडी सोहळा, विविध शालेय स्पर्धा, आरोग्य शिबीरे, वृक्षारोपन सारखे सामाजीक ऊपक्रम श्रीकृष्ण मीञ मंडळाच्या माध्यमातुन प्रामुख्याने राबवले जातात.परळी पोलीस स्टेशन समोर तीन दिवस उपोषण करुन परिसरातील अवैध धंदे कायमचे बंद करण्याचे कार्य श्रीक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|Assembly Elections

इमेज
  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|Assembly Elections |विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना 196 मुक्त चिन्हांचे पर्याय  राजकीय पक्षांची उमेदवारी नसल्यास अपक्ष म्हणून लढताना उमेदवारांना मतदारांवर प्रभाव पडेल किंवा त्यांच्या लक्षात राहील असेच निवडणूक चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत पारंपरिक चिन्ह जास्त असल्याने त्यात निवडीला वाव नसायचा, त्यात अपक्षांची संख्या जास्त झाली, तर महत्त्वाचे चिन्ह मिळवायची मोठीच स्पर्धा असायची. काही चिन्ह तर शिट्टी, कुकर, पतंग अशी काही चिन्ह खेळणी वाटत असल्याने उमेदवारांचा कल नसायचा. मात्र आता घसघशीत 196 चिन्हांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, नुसतीच चिन्हच वाढलेली नाही तर त्यात नावीन्यता आली आहे. राष्ट्रीय पक्ष वाढले राष्ट्रीय व राज्य पक्षांची मान्यता वाढलेल्या पक्षांमुळे यावेळी पक्षांच्या चिन्हात वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पंजा), भारतीय जनता पक्ष (कमळ), राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कनीस-विळा), शिवसेना (धनुष्यबाण), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (इंजिन), बहुजन समाज पार्टी (हत्ती) या पारंपरिक चिन्हांत आता