पोस्ट्स

नोव्हेंबर ३, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शरदचंद्र पवार यांचा राजेभाऊ फड यांना ऊर्जादायी शब्द

इमेज
  राजेभाऊ तू काळजी करू नको, मी आहे.... शरदचंद्र पवार यांचा राजेभाऊ फड यांना ऊर्जादायी शब्द परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी वैजनाथ येथे भव्य जाहीर सभा घेतली. परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेने या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारच्या सुमारास त्यांचं परळीत आगमन झालं. यावेळी युवक नेते राजेभाऊ फड यांनी हेलिपॅडवर उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. यावेळी शरदचंद्र पवार यांनी राजेभाऊ फड यांचा हात पकडत म्हटले की, "राजेभाऊ तू संघर्ष करत रहा, काळजी करू नकोस मी आहे..." असा विश्वास दिला. देशाचे नेते, जाणते राजे शरदचंद्र पवार महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ परळी वैजनाथ शहरात आले होते. त्यांचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी स्वतः हेलिपॅडवर उपस्थित राहून प्रभू वैद्यनाथ यांच्या पावन भूमीत स्वागत केले. यावेळी पवार साहेबांनी थोड्याच शब्दांत मोठी ऊर्जा दिली आणि मार्गदर्शन केले. ते मला म्हणाले... "राजेभाऊ तुमच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाची आजच्या समाजाला गरज ...

समन्वयाचा आभाव.....राजेसाहेबांना भोवणार!

इमेज
शरद पवारांच्या सभेआधीच परळीच्या महाविकास आघाडीतील  बेबनाव चव्हाटय़ावर ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचाच फोटो नाही :विचारत न घेताच टाकले शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांचे फोटो परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची परळी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. परळी मतदारसंघात महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.याच अनुषंगाने आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही सगळा आवमेळ असल्याचे दिसून येत आहे. नेमकं शरद पवार सभेला येण्याआधीच परळीच्या महाविकास आघाडीतील बेबनावर चव्हाटय़ावर आल्याचे दिसून येत आहे.        परळी वैजनाथ येथे आज दि. नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मोंढा मार्केट येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अगोदरच ताळमेळ नाही. यातच शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांची सभा या मतदारसंघाला मिळाली मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मोट बांधण...

MB NEWS:सर्वोच्च नेत्याची सभा मिळाली पण..........

इमेज
महाविकास आघाडीत समन्वयच नाही:राजेसाहेबांना परळीत काही जणांची 'हलगर्जी बहादुरकी'भोवणार! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघात अगोदरच अनेक जणांना उमेदवारीच्या रांगेत झुलवत ठेवून परळी तालुक्यातील सर्वच इच्छुक उमेदवारांना टाळत अंबाजोगाई तालुक्यातील राजसाहेब देशमुख यांना शरद पवार यांनी परळी मतदारसंघाची उमेदवारी दिली. राजेसाहेब देशमुख यांचा संपूर्ण बीड जिल्ह्यात संपर्क जरी असला तरी निवडणुकीसाठी त्या त्या शहरांमध्ये प्रॉपर यंत्रणा असणे आवश्यक असते. सद्यस्थितीला परळी शहरात राजेसाहेब देशमुख यांना व्यक्तिशः प्रतिसाद मिळत असला तरी त्यांची प्रॉपर यंत्रणा मात्र महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावाने  दिसून येत नाही. त्यातच ज्यांना जबाबदारी दिली त्या काही जणांच्या 'हलगर्जी बहादूरकी' करण्याच्या पद्धतीने राजेसाहेबांना ही बाब येणाऱ्या काळात अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.             राज्याचे विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे व मुंडे परिवाराचा बालेकिल्ला सम...

परळीत सभा : फुलचंद कराड यांनी केलं हे आवाहन

इमेज
शरदचंद्र पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा-फुलचंद कराड परळी वैजनाथ(प्रतिनिधी)  परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारा निमित्त परळी शहरात होत असलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार  हे मार्गदर्शन करणार असून या सभेला उपस्थित राहून परळी मतदारसंघातील परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले आहे.  परळी येथील मोंढा मैदानावर शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता खासदार शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा होणार असून ही सभा परळी विधानसभा मतदारसंघाचा प्रत्यक्षात विकास करण्याची नांदी ठरणार आहे या सभेत महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार असून परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोंढा मैदानावरील या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन फुलचंद  कराड यांनी केले आहे

महेशदादा लांडगे विजयाची हॅटट्रिक नक्की करतील

इमेज
आ. पंकजा मुंडेंनी भोसरीची सभा धडाकेबाज भाषणाने गाजवली महायुती सरकारचा विकास प्रत्यक्ष दिसणारा ; आघाडीने मात्र जनतेला झुलवत ठेवले  महेशदादा लांडगे विजयाची हॅटट्रिक नक्की करतील भोसरी (पुणे) ।दिनांक ०७। राज्यातील भाजपा महायुती सरकारने केलेला विकास 'हा सूर्य, हा जयद्रथ' असा प्रत्यक्ष समोरासमोर दिसणारा आहे. महाविकास आघाडीने मात्र जनतेला केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले, त्यामुळे या निवडणुकीत भाजपा महायुतीलाच आपली पसंती देऊन पुन्हा एकदा सत्तेवर आणा असं आवाहन  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केले. ही सभा पंकजाताईंनी आपल्या धडाकेबाज आणि आक्रमक भाषणाने गाजवली. सभेला त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विराट जनसमुदाय उपस्थित होता. भोसरी (पुणे) विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार महेश दादा लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उमेदवार महेश दादा लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. अमित गोरखे, सदाशिव खाडे तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीकडे कोणताही मुद्दा, संकल्प राहिलेला नाही. लोकांना केवळ झुलविण्याचे काम त्यांनी...

मंत्री असताना महिलांसाठी अनेक योजना राबविल्या

इमेज
शिरोळेंच्या वतनात, आ. पंकजाताई मैदानात! सिध्दार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ पुण्यात आ. पंकजाताई मुंडेंचा महिला मेळावा स्त्रियांना सन्मान व सुरक्षा देणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेत आणा पुणे ।दिनांक ०६। राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सरकारने स्त्रियांना सन्मान व सुरक्षा देण्याचे काम केले. लाडकी बहिण सारखी योजना राबवून आत्मविश्वास निर्माण केला त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. एक संस्कारी चेहरा असलेल्या सिध्दार्थ शिरोळे यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले. शिवाजीनगर (पुणे) विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ बुधवारी आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सुजाता शिरोळे, वर्षा डहाळे, हर्षदा फरांदे, श्रध्दा शिंदे, लावण्या शिंदे, भावना शेळके, सुवर्णा त्रिगुणाईत आदींसह महायुतीच्या महिला पदाधिकारी मोठ्य...

शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी

इमेज
  आत्मलिंगाची अनुभुती हेच शिवमहापुराण कथेचे सार -प.पु.कनकेश्वरी देवीजी शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी परळी (प्रतिनिधी)  शिवकथा ही मनुष्याला त्याग करायला शिकवते.शिवमहापुराण आत्मलिंगाची अनुभुती देते आणि हेच शिवमहापुराण कथेचे सार असल्याचे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींनी केले.परळी येथील हालगे गार्डन येथे येथे महाशिवपुराण ज्ञानयज्ञात दुसरे पुष्प गुंफताना बोलत होत्या.  परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे दुसरे पुष्प आपल्या सुमधुर वाणीतुन व संगीताच्या साथीने गुंफताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी शिवमहापुराण कथेचे महत्व सांगताना आधुनिक काळात जीवन जगत असताना दान देणारा व दान स्विकारणारा कसा असावा यावर सविस्तर विमोचन केले.शरीर आत्म्याचा आधार नसुन आत्मा शरीराचा आधार आहे.हे जेव्हा समजेल तेव्हा शिवालयात प्रवेश झाला असे समजावे.परंतु आपण शरीरालाच आधार समजतो.ज्याला ...

माधुरी मिसाळ यांना निवडून देणं ही जनतेचीच इच्छा

इमेज
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.पंकजा मुंडे यांनी पर्वती मतदारसंघातून फोडला पुण्यातील प्रचाराचा नारळ माधुरी मिसाळ यांना निवडून देणं ही जनतेचीच इच्छा पुणे ।दिनांक ०६। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पर्वतीमधून माधुरीताई मिसाळ चौथ्यांदा विजयी होणं ही जनतेचीच इच्छा आहे, त्यामुळे त्या विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास आ. पंकजाताईंनी व्यक्त केला तर विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.     भाजपा महायुतीच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज देवेंद्र फडणवीस, आ. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते फोडण्यात आला, त्याप्रसंगी बिबवेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उमेदवार माधुरीताई मिसाळ, विजय शिवतारे, आ. अमित गोरखे, धीरज घाटे आदींसह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पंकजाताई मुंडे सभेस संबोधित करताना म्हणाल्या, सभेला मो...

धक्कादायक दावा : पुनम महाजन नेमकं काय म्हणाल्या ?

इमेज
प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठे षडयंत्र : पूनम महाजन यांचा धक्कादायक दावा      भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत त्यांच्या कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होत्या. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रमोद महाजनांची हत्या हे एक मोठे षड्यं होते. याबाबतचे सत्य कधीतरी बाहेर येईलच, असे विधान पूनम महाजन यांनी केले आहे. पूनम महाजन काय म्हणाल्या ?    पूनम महाजन म्हणाल्या की, प्रमोद महाजन यांच्यावर झाडलेली गोळी फक्त एका माणसाच्या रागाची, मत्सराची नव्हती. राग आणि मत्सर होता. कारण त्या गोळीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. त्या बंदुकीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. पैसे इतके होते की, तुम्ही कोर्ट केसही लढू शकला होता. तुम्ही आयुष्यही घालवू शकला होता. पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती. मी नेहमी म्हणते की त्यामागे मोठे षड्यंत्र होते. आज, उद्या किंवा परवा कधीतरी कळेल, हे षड्यंत्र काय होते. त्यामधून कळेल हे का झ...

परळी मतदारसंघात रंगले "कुर्यात सदा टिंगलम्" !

इमेज
"अरे,ज्यांच्या नेत्याचेच लग्न झाले नाही ते काय तुमचे लग्न लावणार"- धनंजय मुंडे यांनी उडविले 'त्या' वक्तव्याची खिल्ली  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी घाटनांदुर येथील सभेत तरुण मुलांच्या लग्नाबाबत केलेल्या अजब वक्तव्यानंतर या आश्वासनाची सोशल मीडियातून जोरदार चर्चा होत आहे. यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याचअनुषंगाने राजसाहेब देशमुख यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनीही या वक्तव्याची खिल्ली उडवत ज्यांच्या नेत्यांचीच लग्नं झाले नाहीत ते काय तुमचे लग्न लावून देणार ?अशा शब्दात त्या अजब आश्वासनाचा समाचार घेतला आहे.           घाटनांदुर येथे झालेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी तरुण मुलांची अविवाहित राहण्याची मोठी संख्या आहे. तुम्हाला लग्नाला मुली मिळत नाहीत. मला आमदार करा तुमचे लग्न लावून देतो अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्य...

कष्ट आणि निष्ठेचं फळ काय ?

इमेज
  आपले कष्ट आणि निष्ठा निरर्थक जाणार नाही ! शरदचंद्र पवार यांनी राजेभाऊ फड यांना लिहिले पत्र परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना पत्र पाठवून आपल्या भावना कळवल्या आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात आपण घेतलेली मेहनत आणि कष्टाला निरर्थक जाऊ देणार नाही. तुम्ही केलेल्या कामाची पक्षाने नोंद घेतली असून आपल्याला भविष्यात योग्य न्याय दिला जाईल असा शब्द त्यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना दिला आहे  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना नुकतेच पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राजेभाऊ फड यांचे कौतुक केले असून, पक्षाचे मतविभाजन होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेली माघार अभिनंदनीय असल्याचे म्हटले आहे. इच्छुक उमेदवार संख्या जास्त असल्याने त्यातून उमेदवार देत असताना मानाची घालमेल होत असून, आपण पक्षासाठी केलेलं काम आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा निरर्थक जाऊ देणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ...

भव्य ग्रंथदिंडीने हालगे गार्डन येथे श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ

इमेज
  शिष्यांची क्षमता ओळखून उपदेश करणारेच खरे गुरु -प.पु.कनकेश्वरी देवीजी भव्य ग्रंथदिंडीने हालगे गार्डन येथे श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ परळी (प्रतिनिधी) समोर बसलेल्या शिष्यवृंदाची मानसिकता, ऐकण्याची व आचरण करण्याची क्षमता ओळखून त्या शिष्यांना समजेल असे ज्ञान देणारेच खरे गुरु असुन अशा गुरु कडून मिळालेल्या ज्ञानातुन नम्र शिष्य घडत असतात असे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींनी केले.परळी येथील हालगे गार्डन येथे येथे माताजींच्या श्री शिवमहापुराण कथेस बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून उत्साहात प्रारंभ झाला.  परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होत आहे.या कथेचे पहिले पुष्प आपल्या सुमधुर वाणीतुन व संगीताच्या साथीने गुंफताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी गुरु शिष्यामध्ये नाते कसे असावे हे सविस्तरपणे सांगितले.मजबुरीत माणसाच्या अंगी असलेली विनम्रता ही खरी विनम्रता नसुन यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतरही जो माणुस लहान...

परळीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत व्यापारी स्नेह मिलन

इमेज
स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क - धनंजय मुंडे परळीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत व्यापारी स्नेह मिलन व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सर्वांच्या सहकार्याने भरारी घेऊ - मुंडेंचा शब्द परळी वैद्यनाथ (दि. 06) - स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे हे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी बाजार समितीच्या नावे विकत घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क आहे, व्यापारपेठेची वृद्धी करताना ही जमीन अत्यंत अल्प दरात व्यापारी बांधवांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत बोलताना व्यक्त केले आहे. मंगळवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी तालुक्यातील व्यापारी बांधवांचा दीपावली निमित्त स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.  काहीजण जाणीवपूर्वक परळीत दहशत दादागिरी म्हणून, व्यापाऱ्यांना अडचण म्हणून नेहमीच परळीची बदनामी करत आहेत. मात्र खरोखर परळीत व्यवसाय करणाऱ्या लहानात लहान व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यवसायिकांपर्यंत कुणालाह...

माधुरीताईंना विक्रमी मताधिक्य मिळेल

इमेज
आ.पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने  पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले ! विकास कामांच्या जोरावर माधुरीताई मिसाळ चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होतील पुणे ।दिनांक ०६। पर्वती मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या बुधवारी संध्याकाळी निघालेल्या भव्य प्रचार रॅलीने वातावरण अक्षरशः ढवळून निघाले. माधुरीताई ह्या सर्व सामान्य जनतेच्या उमेदवार आहेत, त्यांनी मतदारसंघांत केलेल्या विकास कामांमुळे त्या सलग चौथ्यांदा विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास आ. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.    भाजपा महायुतीच्या उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मतदारसंघांतील जनता वसाहतीत काल आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत मतदार बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. सुमारे तीन तास चाललेल्या या रॅलीत मतदारांचा मोठा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला. वाजतगाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत व जेसीबीतून फुलांची उधळण करत भल्या मोठ...

*व्वा रे अश्वासन....काय तर म्हणे मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्नं करु !

इमेज
अजब अश्वासन -अफलातून प्रचाराचा फंडा: परळी मतदारसंघातील हे उमेदवार म्हणाले, 'मला आमदार करा;बिनालग्नाच्या सगळ्या पोरांची लग्न करु ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोण काय म्हणेल आणि प्रचार करण्यासाठी कोणते आश्वासने देईल हे न बघितलेलेच बरे. प्रचाराच्या भाषणांमधून वाटेल ते बोलणे आणि मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय नेते करत असतात यातून काही मजेशीर प्रसंग ही उद्भवतात. त्याचबरोबर काही वक्तव्यावरून साधक- बाधक चर्चा घडतात, काही विधाने वादग्रस्त ठरतात, सोशल मीडियातून त्यावर ट्रोलिंग केलं जातं अशा वेगवेगळ्या पद्धतीने कोण कोणते वाक्य कोणत्या अर्थाने घेईल हे सांगता येत नाही. असाच एक मजेशीर प्रसंग आता परळी मतदार संघातील एका उमेदवाराच्या भाषणातून चर्चेला आला आहे.           परळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडुन द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी घाटनांदूर येथे झालेल्या जाहीर सभेत भाषणातून लग्नाचा फंडा वापरला आहे...

आज दुपारी ३ वा.शिवमहापुराण कथेला प्रारंभ

इमेज
  शिवमहापुराण कथाव्यास प.पु.कनकेश्वरी देवीजींचे झाले परळीत शुभागमन ! छायाचित्र:सुनील फुलारी,परळी वैजनाथ.  परळी वैजनाथ, प्रतिनिधी       बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे आजपासून विश्वविख्यात कथा प्रवक्ता  प.पु कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा आजपासून प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने दुपारी दोन वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे. आज सकाळी परमपूज्य कनकेश्वरी देवींचे शुभ आगमन परळी वैजनाथ शहरात झाले आहे. छायाचित्र:सुनील फुलारी,परळी वैजनाथ.  छायाचित्र:सुनील फुलारी,परळी वैजनाथ.       श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या आज बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून हालगे गार्डन येथे होत असलेल्या शिवपुराण कथा ज्ञान यज्ञाचा प्रारंभ शहरातुन भव्य ग्रंथदिंडीने होत आहे. परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होणार आहे.या महाकथेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.या ...

निधन वार्ता....

इमेज
  तळेगाव येथील युवा शेतकरी धनराज ज्ञानोबा तांबडे यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे तळेगाव येथील युवा शेतकरी धनराज ज्ञानोबा तांबडे यांचे आज मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी आकस्मिक निधन झाले. मृत्यू समय ते 45 वर्षाचे होते.      तळेगाव येथील शेतकरी धनराज तांबडे यांचे आज दुपारी गावामध्ये आकस्मिक निधन झाले. धनराज तांबडे हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे आणि मिळून मिसळून वागणारे असल्याने सर्वांच्या परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तळेगावावर शोककळा पसरली. कै. धनराज तांबडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.    कै. धनराज तांबडे यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊजी, भावजई, पुतणे असा भरगच्च परिवार आहे. वैद्यनाथ कारखान्याच्या कामगार युनियनचे अध्यक्ष विष्णू तांबडे यांचे ते बंधू होत. राख सावडण्याचा कार्यक्रम      दरम्यान कै. धनराज तांबडे यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता तळे...

परळीत शिवमहापुराण कथा: ग्रंथदिंडीने होणार प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या कथेस प्रारंभ

इमेज
परळीत शिवमहापुराण कथा:  ग्रंथदिंडीने होणार प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या कथेस प्रारंभ परळी (प्रतिनिधी)  श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या आज बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून हालगे गार्डन येथे होत असलेल्या शिवपुराण कथा ज्ञान यज्ञाचा प्रारंभ शहरातुन भव्य ग्रंथदिंडीने होत आहे.    परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होणार आहे.या महाकथेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.या कथेचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार आहे. दुपारी २ वाजता वैद्यनाथ मंदिर येथून ही ग्रंथदिंडी निघणार असून हालगे गार्डन येथे पोहचल्यानंतर कथेस प्रारंभ होणार आहे.या ग्रंथदिंडी व माता कनकेश्वरी देवीजींच्या या शिवमहापुराण कथेस भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले आहे.

निधन वार्ता: संभाजी मुंडे यांचे निधन

इमेज
  निधन वार्ता: संभाजी मुंडे यांचे निधन  परळी वै. ता.५ प्रतिनिधी         शहरातील अयोध्या नगर येथील संभाजी पाटलोबा मुंडे (वय-७०) यांचे सोमवारी (ता.४) रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास ऱ्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.       औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी संभाजी पाटलोबा मुंडे (एस पी मुंडे) कर्मचारी महासंघाचे केंद्रीय कमेटी सदस्य होते. त्यांनी विज निर्मिती केंद्रातील कर्मचारी वर्गासाठी भरीव काम केले आहे. त्यांचा धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावर होता. त्यांनी त्यांच्या पत्नीला पंचायत समितीवर १९९२ साली निवडुण आणले होते. संभाजी मुंडे यांच्या पार्थिवावर  मंगळवारी (ता.५) सकाळी ९:०० वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राख सावडण्याचा विधी बुधवारी सकाळी ७:३० आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

दुःखद वार्ता: श्रीरामपंत जोशी यांचे पुणे येथे निधन

इमेज
श्रीरामपंत जोशी यांचे पुणे येथे निधन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी वैजनाथ येथील ब्राह्मण बहुउद्देशीय सभेचे विश्वस्त सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते श्रीरामपंत गोविंदराव जोशी यांचे आज दि.5 वा. पुणे येथे अल्पश: निधन झाले.      मृत्यू समयी ते  67 वर्षे वयाचे होते.सध्या ते पुणे येथे आपल्या मुलाकडे राहत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे उद्या दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

परळीत एकाकडून तीन गावठी कट्टे जप्त

इमेज
परळीत एकाकडून तीन गावठी कट्टे जप्त: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई परळी : बेकायदेशीररित्या विनापरवाना शस्त्र बाळगत असल्याची माहिती बीड येथील पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परळी येथील भीमनगर भागातून एकास ताब्यात घेतले. तपासणीत त्याच्याकडून तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडातुस आढळून आले.        शहरातील भीमनगरमध्ये  पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सोमवारी रात्री एकास अटक केली आहे. वैभव रोहिदास घोडके असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तीन गावठी कट्टा (पिस्टल ) व सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त  केली आहे. याची किंमत एक लाख 56 हजार रुपये आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकातील पोलीस जमादार सचिन सानप यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून वैभव रोहिदास घोडके विरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखा बी...

आखाडा विधानसभेचा: परळी मतदारसंघ : राजकीय विश्लेषण....

इमेज
आखाडा विधानसभेचा: बसपा वगळता ना वंचित, ना एमआयएम ना मनसे ना आरएसपी परळीत 'ओन्ली एनसीपी' ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले व काल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती यातून कोणकोण मैदानात उतरले आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या दावेदार्यांचा विचार केला तर प्रमुख व चर्चेतील राजकीय पक्षांपैकी बसपा वगळता ना वंचित, ना एमआयएम ना मनसे ना आरएसपी परळीत ओन्ली एनसीपी अशीच स्थिती निर्माण झालेली आहे.        सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कोणकोणते उमेदवार उभे राहणार याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच ती अन्य राजकीय पक्षांबाबतही असते. परळी मतदारसंघातील निवडणूकीची सद्यस्थिती बघितली तर याठिकाणी आता केवळ ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय पक्षांचा विचार केला तर याठिकाणी सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेस च्या दोन गटांमध्येच लढत होणार असे चित्र आहे. भाजपची ही पा...

प्राचार्य प्रदिप जबदे यांना मातृशोक: अनेकांकडून शोकसंवेदना

इमेज
  प्राचार्य प्रदिप जबदे यांना मातृशोक: अनेकांकडून शोकसंवेदना परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्य पदावर कार्यरत राहिलेल्या प्राचार्य प्रदीप विष्णुपंत जबदे यांच्या मातोश्री श्रीमती अंबुताई जबदे यांचे वृद्धापकाळाने दि.31 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आप्तेष्ट, स्नेहीजन, हितचिंतक, मित्र परिवार आदी सर्वांकडूनच शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. जबदे कुटुंब हे मूळ परळी येथील रहिवासी आहे.        परळीचे भूमिपुत्र असलेले  प्राचार्य प्रदिप विष्णुपंत जबदे , कै.ॲड.उल्हास जबदे व कै. अनिल उर्फ राजाभाऊ जबदे यांच्या मातोश्री श्रीमती अंबुताई विष्णुपंत जबदे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 98 व्या वर्षी दिनांक 31/10/24 रोजी निधन झाले.छ. संभाजीनगर येथे त्यांच्यावर अंत्यविधी झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,सुना नातवंडे, पंतवंडे असा मोठा परीवार आहे. जबदे कुटुंबपरळीतील सर्व परिचित कुटुंब आहे. प्राचार्य प्रदीप जबदे यांचा मोठा मित्रपरिवारही परळीत आहे. प्राचार्य प्रदीप जबदे व कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंग...

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन!

इमेज
श्रीगुरु संत सोपानकाका उखळीकर यांच्या ७७ व्या पुण्यतिथी निमित्त आज परळीत एक दिवसीय कीर्तन महोत्सव परळी वै.  प्रतिनिधी....         श्री गुरु संत सोपानकाका महाराजांचा समाधी सोहळा आज मिती कार्तिक शु.४ मंगळवार, दि.०५/११/२०२४ रोजी असुन त्यानिमित्त परळीत एक दिवसीय कीर्तन महोत्सव  आयोजित करण्यात आला आहे.भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.      श्री संत सोपानकाका महाराज मंदिर (उखळीकर भजनी फड), परळी वैजनाथ जि. बीड येथे आज मिती कार्तिक शु.४ मंगळवार, दि.०५/११/२०२४ रोजी पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त श्री. संत जगमित्रनागा मंदिर येथे स. १० ते १२ पुजेचे कीर्तन  श्री.ह.भ.प. बालासाहेब महाराज उखळीकर यांचे होईल.  व श्री संत सोपानकाका मंदिर येथे दु. १ ते ३ या वेळेत श्री.ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, पंढरपुर यांचे कीर्तन होईल व तद्नंतर महाप्रसाद होईल. तसेच रात्रौ . ८ ते १० श्री.ह.भ.प. किशन महाराज पवार (अध्यक्ष, मुकुंदराज संस्थान, अंबाजोगाई) यांचे कीर्तन होईल. या सोहळ्यास पुरुषोत्तम श्रीधर नाना महारा...

परळीत भक्तीपर्वणी:जय्यत तयारी,भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
परळीत ६ तारखेपासून प.पु. माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा हालगे गार्डन येथे जय्यत तयारी,भाविकांनी उपस्थित राहण्याचे कोरे परिवाराचे आवाहन परळी (प्रतिनिधी)  देश,विदेशात सहाशे पेक्षा अधिक रामकथा,श्रीमद् भागवत कथा,देवी भागवत कथा,शिव महापुराण आपल्या सुमधुर वाणीतुन सांगणार्या श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून परळी येथे शिवपुराण कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ होत असून या कथेस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सौ.जयश्री प्रभु कोरे परिवार हिंपळनेकर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले आहे.वतीने करण्यात आले आहे.    परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होणार आहे.या महाकथेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.यासाठी मंच समिती,निवास समिती,कार्यालय समिती,बैठक व्यवस्था समिती, आरोग्य समिती, धार्मिक विधी समिती,पाणी पुरवठा स्वच्छता समिती,आरती व प्रसाद...

परळीत होणार जाहीर सभा !

इमेज
नऊ तारखेला खा. शरदचंद्र पवार परळीत : जाहीर सभेचे आयोजन - ॲड. जीवनराव देशमुख  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची परळी येथे नऊ तारखेला जाहीर सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी दिली आहे.             परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर असून परळी वैजनाथ येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. महायुती सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेला बसलेल्या झळा आणि महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या महायुती सरकारला धडा शिकविण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने असुन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे स...

पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास

इमेज
  विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक जिंकून महायुती पुन्हा सत्तेवर येईल -  आ.पंकजाताई मुंडे  पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास जनता सुज्ञ आहे, फेक नरेटिव्हला बळी पडणार नाही पुणे ।दिनांक ०४। भाजपा महायुती सरकारने राज्यात विकासाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या, याचा लोकांना फायदाच झाला. विकासाच्या केवळ ह्याच अजेंड्यावर आम्ही विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकून पुन्हा सत्तेवर येऊ असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी जनता सुज्ञ आहे, फेक नरेटिव्हला बळी पडणार नाही असंही त्यांनी सांगितलं.   भाजपच्या मिडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कवीटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर , नामदेव माळवदे आदी यावेळी उपस्थित होते.   आम्ही कार्यकर्ते एका विचारधारा आधारे निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडी सरकार जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आले होते, त्यांनी जनतेसाठी काहीच केले नाह...

निवडणूक आखाड्यात धनंजय मुंडेंच्या 'खेळ्या' यशस्वी !

इमेज
पहिला पडाव:परळी मतदारसंघात सर्व बाबी वजा अन् सरस बेरजेचे राजकारण :धनंजय मुंडे यांची यशस्वी निवडणूक रणनिती! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यमान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदार संघाकडे वजनदार राजकीय नेत्यांनी विशेष लक्ष घालून या मतदारसंघाची निवडणूक आणखीनच लक्षवेधी केलेली आहे. धनंजय मुंडे यांचा वारू रोखण्यासाठी राजकारणातील अनेक डाव -प्रति डाव, खेळ्या आणि रणनीतीने गेले काही दिवस बहरून गेलेले दिसले. मात्र परळी मतदारसंघाची संपूर्ण नाडी माहीत असलेल्या धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच संयम ठेवत अतिशय चानाक्षपणाने त्यांची एक- एक खेळी खेळल्याचे दिसून येते. निवडणुकीचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांच्या या खेळ्यांना यश आल्याचेही दिसते. एकंदरीतच धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघाच्या निवडणूक राजकारणात बाकी सगळ्याच गोष्टी वजा करत सरसपणे बेरजेची रणनीती अंमलात आणल्याने निवडणूकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात त्यांनी यश आपल्या बाजूने मिळवल्याची चर्चा होत आहे.        ...

पहा यादी:परळीतून कोणी कोणी घेतले अर्ज मागे

इमेज
पहा यादी:परळीतून कोणी कोणी घेतले अर्ज मागे परळी वैजनाथ, प्रतिनिधी      संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. परळी मतदारसंघातून 'या' उमेदवारांनी घेतली माघार! 1.धनराज अनंतराव गुंठे भारतीय प्रजा सुराज्य पक्ष 2.महेंद्र अशोक ताटेआंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी 3.मुस्तफा मैनोद्दीन शेख ऑल इंडिया मज्तीस ए इन्कलाब ए मिल्लत 4.शेख तौसिफ अब्दुल सत्तार बुलंद भारत पार्टी 5.अच्यूराव रंगनाधराव गंगणे अपक्ष 6.अतीक सिकंदर शेख अपक्ष 7.अरशादखान जमीलखान पठाण अपक्ष 8.अशफाक सज्जाद शेख अपक्ष 9.आतीक युसुफ पठाण अपक्ष 10.आबासाहेब पंडितराव आगळे अपक्ष 11.कलीम पाशा शेख अपक्ष 12.केशव ज्ञानोबा मुंडे अपक्ष 13.गौतम प्रकाश आदमाने अपक्ष 14.जयवंत विठ्ठलराव देशमुख अपक्ष 15.दिलीप संभाजी बीडगर अपक्ष 16.नुरमंहमद अमिरसाब कुरेशी अपक्ष 17.पाशा मियां शेख अपक्ष 18.प्रभाकर विठ्ठलराव वाघमोडे अपक्ष 19.प्रमोद द...

आखाडा विधानसभेचा.....परळी मतदारसंघाचा !

इमेज
परळी मतदारसंघात विधानसभेला दोन पत्रकारही निवडणूक रिंगणात! परळी वैजनाथ, प्रतिनिधी  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूकीची वेगळी वैशिष्ट्येही आहेत. विशेष म्हणजे या निवडणूक रिंगणात दोन पत्रकारही उतरले आहेत.     परळी विधानसभा मतदार संघामधून दोन पत्रकार उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत पत्रकारितेच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क निर्माण करणारे पत्रकारही लोकशाहीमध्ये आपले राजकीय बळ आजमावत असतात या अनुषंगानेच दोन पत्रकार परळी विधानसभेची निवडणूक लढवत आहेत यामध्ये विकास इंडिया पार्टीकडून भागवत बबनराव वैद्य तर दै.सरकार चे संपादक साहस पंढरीनाथ आदोडे हे  मराठवाडा मुक्ती मोमार्चच्या वतीने उमेदवारी करत आहेत.      बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदार...