कोणत्या उमेदवारांनी अर्ज घेतले मागे?

 परळी विधानसभा मतदार संघ : दोन जणांनी अर्ज घेतले मागे



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या दिसून येत असून  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 58 उमेदवारांचे 72 अर्ज दाखल झाले होते. दि. 30 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये एकूण 58 पैकी 10 अर्ज छाननीत बाद झाले तर 48 अर्ज वैध झाले. आज दि.31 रोजी दोन जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.चार नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

    विष्णु नामदेव राठोड अपक्ष इनाम तांडा, गोवर्धन हिवरा ता. परळी वै. जिल्हा बीड व साहेबराव नामदेवराव जाधव अपक्ष शाहूनगर, बीड या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.अशी माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 233- परळी विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.

        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!