आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

 आता माघार घेऊ नका, राजेभाऊ तुम्ही लढाच!

परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या परळी मतदारसंघातील जनतेचा राजेभाऊ फड यांना आग्रह


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी विधानसभा मतदारसंघात विकास घडवून आणायचा असेल आणि मतदारसंघातील वातावरण निर्भय आणि सर्वधर्म समभावाचे बनवायचे असेल तर त्यासाठी परिवर्तन घडवावे लागेल. त्यासाठी युवक नेते राजेभाऊ फड हे सक्षम उमेदवार आहेत अशी जनसामान्यांच्या मनात भावना निर्माण झाल्याने मतदारसंघातून फड यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. निवडून येण्यास ते सक्षम उमेदवार असून त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह मतदरांतून केला जात आहे. त्यांनी कुठल्याही स्थितीत माघार न घेता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढवावी असा आग्रह परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या मतदार बांधवांतून केला जात आहे.


परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होईल असे चित्र निर्माण झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना तगडी लढत देऊ शकेल असा एकमेव उमेदवार राजेभाऊ फड आहेत अशी जनतेत भावना आहे. विकासाची सकारात्मक दृष्टी, उद्योग व्यापारातील त्यांचे संबंध यामुळे ते या मतदारसंघात रोजगार निर्मिती देऊ शकतात. अभ्यासू व्यक्तित्व असल्याने येथील वातावरण ते निर्भय बनवू शकतात त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाला नव्या नव्या संकल्पना मिळून इथला सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो असा जनतेतून विश्वास व्यक्त केला जात आहे. आजवर राजेभाऊ फड यांनी मदत मागण्यासाठी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. कुठलेही काम असेल तरी ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे नेहमीच सर्वांसाठी उपलब्ध असतात. म्हणून आम्हाला राजेभाऊ फड यांनाच आमदार करायचे आहे असा ठाम निश्चय जनतेतून व्यक्त केला जात आहे.


आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

राजेभाऊ फड यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. मागील काळातील सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परळी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राजेभाऊ फड यांनी निवडणूक लढवावी आणि कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नये असा आग्रह जनतेतून केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?