युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|Assembly Elections

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|Assembly Elections |विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना 196 मुक्त चिन्हांचे पर्याय 

राजकीय पक्षांची उमेदवारी नसल्यास अपक्ष म्हणून लढताना उमेदवारांना मतदारांवर प्रभाव पडेल किंवा त्यांच्या लक्षात राहील असेच निवडणूक चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत पारंपरिक चिन्ह जास्त असल्याने त्यात निवडीला वाव नसायचा, त्यात अपक्षांची संख्या जास्त झाली, तर महत्त्वाचे चिन्ह मिळवायची मोठीच स्पर्धा असायची. काही चिन्ह तर शिट्टी, कुकर, पतंग अशी काही चिन्ह खेळणी वाटत असल्याने उमेदवारांचा कल नसायचा. मात्र आता घसघशीत 196 चिन्हांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, नुसतीच चिन्हच वाढलेली नाही तर त्यात नावीन्यता आली आहे.

राष्ट्रीय पक्ष वाढले राष्ट्रीय व राज्य पक्षांची मान्यता वाढलेल्या पक्षांमुळे यावेळी पक्षांच्या चिन्हात वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पंजा), भारतीय जनता पक्ष (कमळ), राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कनीस-विळा), शिवसेना (धनुष्यबाण), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (इंजिन), बहुजन समाज पार्टी (हत्ती) या पारंपरिक चिन्हांत आता तृणमूल काँग्रेस (फुल- गवत), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (हातोडा-विळा-तारा), नॅशनल पीपल्स पार्टी (पुस्तक) या पक्षांच्या चिन्हाची भर पडली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा निवडणूक चिन्हांत समावेश झाला आहे. त्यात सीसीटीव्ही, पेनड्राइव्ह, बेबी वॉकर, पेन स्टॅन्ड, रूम कुलर, स्विच बोर्ड, भेटवस्तू, टूथ पेस्ट, इंजेक्शनची सिरीन, दुर्बीण, कॅमेरा, बॅटरी, सायकलचा पंप, क्रेन अशा नानाविध वस्तूंसोबत कालबाह्य झालेलं दळण दळायचं जातं, बांगड्या, चपला, हार, हिरा, कढई, फोन चार्जर, प्रेशर कुकर, कॅमेरा, बुद्धिबळ, हेल्मेट, पत्रपेटी ट्रक, ट्रॅक्टर, मोत्यांचा हार, बॅटरी, बूट, मोजे अशी चिन्हेदेखील आयोगाने उपलब्ध करून दिली आहेत.

चाळणीपर्यंत घरगुती वस्तूंना निवडणूक चिन्हांत स्थान मिळाले आहे. घरगुती वस्तूंशिवाय सार्वजनिक वस्तूंची रेलचेल आहे. त्यात कपाट, एअर कंडिशनर, फुगा, बांगड्या, फलंदाज, दुर्बीण, विटा, कोट, झगा, फुटबॉल, विजेचा खांब, ऊस शेतकरी, गॅस सिलिंडर, हॅट, किटली, चावी, काडेपेटी, लायटर, नेलकटर, गळ्यातील टाय, तंबू, करवत, जेवणाचे ताट, मटार, पेनड्राइव्ह, अननस आदी विविध प्रकारची 196 मुक्त चिन्हे अपक्षांना उपलब्ध आहेत.

चिन्हांचे चांगले पर्याय


काही चिन्ह तर शिट्टी, कुकर, पतंग अशी काही चिन्ह खेळणी वाटत असल्याने उमेदवारांचा कल नसायचा. मात्र आता घसघशीत 196 चिन्हांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, नुसतीच चिन्हच वाढलेली नाही तर त्यात नावीन्यता आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या