पोस्ट्स

ऑक्टोबर २०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

इमेज
भाजपात पंकजा मुंडेंसारख्या दिग्गजांना बेदखल केले जाते तर सामान्यांची काय गत - राजेश देशमुख भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा; पत्रकार परिषदेत घोषणा परळी (प्रतिनिधी)       मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने आता या पक्षाचा आणि माझा कसलाही संबंध उरलेला नाही. इथल्या नागरिकांच्या आशा आणि अपेक्षा सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचा आम्ही पूर्णतः अभ्यास केल्याने मध्यंतरीच्या काळात शरदचंद्र पवार यांच्याकडे आम्ही उमेदवारी मागण्यांसाठी भेटलो आहोत. इथल्या संपूर्ण परिस्थितीची त्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ सोबत घेऊन आम्ही मुंबई येथे त्यांची भेट घेतली. मागील काळात पंकजाताई यांच्यासोबत आम्ही काम करण्याचं ठरवल होत मात्र आता बीड जिल्ह्यात हा पक्ष शिल्लक राहतो की नाही अशी अवस्था आहे. जिथे पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना त्या पक्षात नजरांदाज केले जाते तर आमच्या भवितव्याचा इथे विचार केला जाणार नाही असे वाटल्याने आता आम्ही ज्या मूळ पुरोगामी विचारांच्या पक्षात काम करत होतो तिथेच परत येऊन काम करण्याचे मी ठरवले असल्याचे ज्येष्ठ

निष्ठा सरस ठरली: शरद पवारांनी दिली पून्हा "भैय्यांनाच" संधी

इमेज
  निष्ठा सरस ठरली: विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच तिकीट बीड: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे . गेल्या काही दिवसापासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे कुणाला उमेदवारी देतात याबाबत उत्सुकता ताणली गेली होती ,त्यातच राष्ट्रवादी पक्षाने बोलावलेल्या इच्छुकांच्या बैठकीस संदीप क्षीरसागर हे उपस्थित राहू शकले नव्हते ,मात्र नंतर त्यांनी स्वतंत्रपणे पवारांची भेट घेतली होती .राष्ट्रवादीकडून ज्योतीताई मेटे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेही इच्छुक होते पण पुन्हा एकदा शरद पवार यांनी तरुण आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड विधानसभा मतदारसंघ लढवण्याची आणि तो जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीचे महाआघाडी कडून स्वागत करण्यात आले आहे.

बीड भाजप नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

इमेज
शंकर देशमुख भाजपचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष     भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.       भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.दोन पिढ्यापासून पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख कुटुंबाला न्याय दिला आहे. भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची कार्यकारी  जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाला हबाडा: रमेश आडसकरांनी वाजवली तुतारी !

इमेज
भाजपाला हबाडा: रमेश आडसकरांनी वाजवली तुतारी ! धारूर, प्रतिनिधी....  माजलगाव  मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर शरद पवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष होते. आज ही प्रतिक्षा संपली असून भाजप नेते रमेश आडसकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षात प्रवेश केला. यामुळे आता माजलगावमधून निवडणूक रिंगणात रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.          राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती- महाआघाडी पक्षातील फूट या नवीन समीकरणामुळे बंडखोरी, पक्षांतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांकडून माजलगाव मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु होती. माजलगाव मतदारसंघासाठी भाजपाचे मोहन जगताप व रमेश आडसकर यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनाच पुन्हा उमेदवारी देवून अजित पवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे. यामुळे आता तुतारी कोण वाजविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दि.25 शुक्रवारी रमेश आडसकर यांनी मुंबई येथे शरद पवार यांची त्यांच्या सिल

MB NEWS: अग्रलेख >>>>नवे संस्थानिक.. नवे सुभेदार...त्या-त्या वतनाचे आम्हीच वतनदार !

इमेज
  नवे संस्थानिक.. नवे सुभेदार...त्या-त्या वतनाचे आम्हीच वतनदार !         स ध्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरु आहे.सर्वच पक्ष आपापले उमेदवार निवडत आहेत.एकंदरीत उमेदवारी देतांना काही राजकीय कुटुंबातील सर्वच सदस्य सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.जणू काही या राजकीय कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त एकही कार्यकर्ता त्या लायकी नसतो.प्रमुख नेते,खासदार-आमदार पुत्र, बायको, पुतण्या,मुलगी, जावई, भाऊ नसेलच तर अगदी नात्यातील जवळचा नातलग हेच आमदारकीसाठी लायक आहेत  बाकीच्यांचा हा प्रांतच नाही असे काहीसे चित्र सर्वच पक्षांतून दिसुन येत आहे. आज घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही. नवे सुभेदार, नवे संस्थानिक जन्माला आले आहेत.  महाराष्ट्राचे राजकारण हे काही मोजक्या कुटुंबांभोवती फिरत असल्याचेच दिसते. ‘घराणेशाही’ या शब्दात अनेक गíभतार्थ दडलेले आहेत. त्यात नकारात्मक अर्थ अधिक आहे. ‘राजकीय कुटुंब’ असा घराणेशाहीला शोभणारा सौम्य अर्थही त्यात आहे.      या घराणेशाहीचे केवळ राजकीयच नव्हे, तर अनेक सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.आपल्या राजकारणाचा प्रवास लोकशाही  या गोंडस नावाखाली सुरू अस

परळीत कुत्रे पिसाळले !

इमेज
  परळीत कुत्रे पिसाळले: 23 जणांना घेतला चावा ; नागरीकांनी काळजी घ्यावी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या दोन तासांमध्ये सुमारे 23 जणांचा सहावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. आज गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान चावा घेतलेल्या नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकच गर्दी केली होती.        गुरुवार दिनांक 24 ऑक्चटोबर रोजी सांयकाळी 6.30 वाजल्याचे नंतर नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. समोर येईल त्याला आणि पुढे चालणाऱ्याला पाठीमागून चावा घेत अवघ्या दीड दोन तासांत 23 लोकांना जखमी केले चावा घेतलेल्या नागरिकांनी परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी धाव घेतली.  तेथे रुग्णांना इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आले. दरम्यान अवघ्या काही वेळामध्येच रुग्णालयामध्ये अक्षरशः कुत्रा चावलेल्या नागरिकांची गर्दी झाली होती.      पिसाळलेला कुत्रा परिसरामध्ये धुमाकूळ घालत असून 23 चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे

वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी

इमेज
वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नव्याने प्रवेश केलेले गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना वंचित बहुजन आघाडीने गंगाखेड मधून उमेदवारी घोषित केले आहे. तर पाथरी मतदारसंघातील उमेदवारी बदलून या ठिकाणी नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार

इमेज
काँग्रेसची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने यादी ( Congress Candidate List 2024 ) जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने नागपूर, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र यातील मतदारसंघांसह एकूण ४८ जागा जाहीर केल्या आहेत. आमचं ८५-८५-८५ जागांचं ठरलं आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. आता दोन पक्षांनी नावं जाहीर केल्यानंतर काँग्रेसची यादीही   कुठून कोणाला संधी? १) के.सी. पाडवी, अक्कलकुवा २) राजेंद्र गावित, शहादा ३) किरण दामोदर, नंदुरबार ४) शिरीशकुमार नाईक, नवापूर ५) प्रवीण चौरे, साक्री ६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण ७) धनंजय चौधरी, रावेर ८) राजेश एकाडे, मलकापूर ९) राहुल बोंद्रे, चिखली १०) अमित झनक, रिसोड ११) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे १२) सुनील देशमुख, अमरावती<br>१३) यशोमती ठाकूर, तिवसा १४) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर १५) रणजीत कांबळे, देवळी १६) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम १७) बंटी शेळके, नागपूर, मध्य १८) व

राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांना पितृशोक

इमेज
वडखेल येथील तुकाराम मारोती देवकते यांचे निधन राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांना पितृशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील वडखेल येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम मारोती देवकते यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. वडखेल ग्रामपंचायतचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांचे ते वडील होत. शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८. वाजता वडखेल येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.        वडखेल येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम मारोती देवकते यांचे गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. कै.तुकाराम मारोती देवकते हे सर्वांशी सुपरिचित व्यक्तिमत्व होते. कै. तुकाराम देवकते हे वारकरी होते. त्यांनी तंटामुक्तीचे अध्यक्षपद १० वर्ष भुषविले आहे.  अनेक सामाजिक कार्यात ते अग्रणी होते. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली. कै.तुकाराम मारोती देवकते यांच्या पाश्चात्य २ मुले, १

शरद पवार गटाची पहिली यादी वाचा एका क्लिकवर

इमेज
  बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; कुणाला मिळाली उमेदवारी? शरद पवार गटाची पहिली यादी वाचा एका क्लिकवर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर केल्या जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली यादी बुधवारीच जाहीर केली आहे. तर आज शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नाव वाचून यादी जाहीर केली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे. वाचा उमेदवारांची यादी इस्लामपूर - जयंत पाटील काटोल - अनिल देशमुख घनसावंगी - राजेश टोपे कराड उत्तर - बाळासाहेब पाटील मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड कोरेगाव - शशिकांत शिंदे वसमत - जयप्रकाश दांडेगावकर जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर इंदापूर - हर्षवर्धन पाटील राहुरी - प्राजक्त तनपुरे शिरूर - अशोकराव पवार शिराळा - मानसिंगराव नाईक विक्रमगड - सुनील भुसारा कर्जत जामखेड - रोहित पवार अहमदपूर - विनायकराव पाटील सिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणे उदगीर - सुधाकर भालेराव भोकरदन - चंद्रकांत दानवे तुमसर - चरण वाघमारे किनवट - प्रदीप नाईक जिं

सर्वोच्च न्यायालयाकडून 'घड्याळाबाबत' अजितदादांना दिलासा

इमेज
  सर्वोच्च न्यायालयाकडून 'घड्याळाबाबत' अजितदादांना दिलासा     विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला खुलाश्यासह (disclaimer) चिन्हाचा वापर आणि ते त्यांच्या निर्देशांचे उल्लंघन करणार नाहीत, असे ४ नोव्हेंबरपर्यंत नवीन हमीपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. नवीन हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश "निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत तुम्ही (अजित पवार गट) आमच्या निर्देशांचे उल्लंघन करणार नाही, असे नवीन हमीपत्र दाखल करा. तुम्ही स्वतःसाठी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण करू नका. जर आमच्या आदेशांचे उल्लंघन केले गेले असेल तर अवमानना कार्यवाही सुरु करावी लागेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ नोव्हेंबरला होणार आहे. शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर  गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि

असा असेल धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संपूर्ण कार्यक्रम

इमेज
  कृषिमंत्री धनंजय मुंडे आज (24 ऑक्टोबर) रोजी भरणार साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज आ.पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी राहणार उपस्थित परळी वैद्यनाथ (दि.23) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत साध्या पद्धतीने भरणार आहेत.  उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.  तत्पूर्वी धनंजय मुंडे हे आईंचे आशीर्वाद घेऊन, गोपीनाथगड येथे स्व. मुंडे साहेबांचे, कन्हेरवाडी परिसरात वडील स्व.पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन मग आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल करतील.  असा असेल धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संपूर्ण कार्यक्रम  सकाळी 8.00 वा. आईचे दर्शन  स्थळ - नाथरा निवासस्थान सकाळी 8.05 वा. स

६५ उमेदवारांची नावे एका क्लिकवर!

इमेज
  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ६५ उमेदवारांची नावे एका क्लिकवर!  महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार हा प्रश्न होता. या प्रश्नावर उत्तरे मिळाली असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का दिला आहे. डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतून एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे." "एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार निवडणूक २००९ पासून कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आमदार आहेत. परंतु, २०२२ मध्ये झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन प्रमुख गट पडले. त्यामुळे एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाल

संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार; शिउबाठा सोबतची युती तुटली

इमेज
संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार; शिउबाठा सोबतची युती तुटली राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड संघटनेला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती आता तुटली असून राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. राज्यात 50 पेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉ गंगाधर बनबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संघटक संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होते. आखरे म्हणाले, संभाजी ब्रिगेड गेल्या ३५ वर्षांपासून शिव-फुले-शाहू-आंबेडकर हि विचारधारा घेऊन कार्यरत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे परळी वैजनाथ मतदार संघात अभिजित देशमुख यांची उमेदवारी जाहीर

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून  परळी वैजनाथ मतदार संघात अभिजीत देशमुख यांची उमेदवारी जाहीर परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)..      महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे परळी वैजनाथ मतदार संघात एन. के. देशमुख यांचे पुतणे उच्चविद्याविभूषित तसेच महत्वाकांक्षी उद्योजक असलेल्या अभिजित देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २३ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत मतदारसंघ क्र.२३३ परळी वैजनाथ येथे अभिजित देशमुख उमेदवारी जाहीर होताच मनसैनिकांत उत्साह संचारला आहे. याबाबत बोलताना मायबाप जनता आणि राज ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मनसैनिकांच्या सहाय्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असे प्रतिपादन अभिजित  देशमुख यांनी केले आहे.         परळी वैजनाथचे यशस्वी नगराध्यक्ष असताना परळी वैजनाथ शहरात राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, नटराज रंग मंदिर, महात्मा फुले भाजी मंडई, पक्के आणि मजबूत रस्ते, दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम योजना आदी उत्तमोत्तम उपक्रम यशस्वी नगराध्यक्ष म्हणून एन. के. देशमुख यांनी राबविले होते आता त्यांचाच सक्षम वारसा अभिजित  देशमुख पु

धनंजय मुंडे परळीमधून अधिकृत उमेदवारी जाहीर

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी जाहीर  अजित पवार बारामतीमधून, छगन भुजबळ येवल्यामधून तर धनंजय मुंडे परळीमधून लढणार तुमसर मधून विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा संधी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राजकुमार बडोले यांना संधी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly polls) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२३) जाहीर झाली. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत धनंजय मुंडे (परळी), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), छगन भुजबळ (येवला), अदिती तटकरे (श्रीवर्धन), नरहरी झिरवळ (दिंडोरी), अनिल पाटील (अमळनेर) यांचा समावेश आहे.

Video:ॲड. माधव जाधव यांची काय आहे याचिका?

इमेज
  परळी मतदारसंघातील 122 अती संवेदनशील मतदान केंद्र: बीड जिल्हाधिकारी व परळी तहसीलदार:  ॲड.माधव जाधव यांची काय आहे याचिका? परळी वैजनाथ: परळी विधानसभा मतदारसंघातील १२२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करून बीडचे जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांची जिल्हा बाहेर बदली करावी,अशा प्रकारची मागणी करणारी याचिका ॲड माधव जाधव यांनी मा..उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथे ॲड.वसंतराव साळुंके व ॲड.श्रीनिवास अंबाड यांचे मार्फत दाखल केली आहे.त्यामध्ये मा उच्च न्यायालयाने आदेश करून बीडचे जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांनी दोन दिवसांमध्ये शपथपत्र सादर करण्याचे आदेश केले आहेत. ● काय आहे मागणी याचिका... लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातील परळी विधानसभा मतदार संघ २३३ या विधानसभेमध्ये एकुण ३४२ मतदान केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदार संघातील एकुन १२२ मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात बोगस मतदानाच्या घटना घडलेल्या आहेत. मतदान केंद्र ताब्यात घेवुन मतदारांना मतदान न करू देता दोन ते तीन लोकांनीच मतदान केले. तसेच मतदारांच्या बोटांना मतदान केंद्राच्या बाहेरच शाई

यादीत कुणाची नावं आहेत?

इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ३१ नावांचा समावेश आहे.शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे आणि सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीच्या जागावाटपाचं काम जवळपास होत आलं आहे आणि लवकरच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाने ९९ जागांची यादी जाहीर केली. तर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे आणि सगळ्या उम

बीड जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर

इमेज
  राज ठाकरेंच्या मनसेची दुसरी यादी आली: बीड जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर  मुंबई  : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विधानसभेसाठी ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? १.कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील २.माहिम - अमित राज ठाकरे ३.भांडुप पश्चिम - शिरीष सावंत ४.वरळी - संदीप देशपांडे ५.ठाणे शहर - अविनाश जाधव ६.मुरबाड - संगिता चेंजवणकर ७.कोथरुड - किशोर शिंदे ८.हडपसर - साईनाथ बाबर ९.खडकवासला - मयुरेश वांजळे १०.मागाठाणे - नयन कदम ११.बोरीवली - कुणाल माईणकर १२.दहिसर - राजेश येरुणकर १३.दिंडोशी - भास्कर परब १४.वर्सोवा - संदेश देसाई १५.कांदिवली पूर्व - महेश फरकासे १६.गोरेगाव - विरेंद्र जाधव १७.चारकोप - दिनेश साळवी १८.जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे १९.विक्रोळी - विश्वजित ढोलम २०.घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल २१.घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे २२) माऊली थोरवे-चेंबूर २३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर २४) निलेश बाणखेले-ऐरोली २५) गजानन काळे-