कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त किर्तनात प्रतिपादन
जन्म-मरण अटळ:सर्व परिस्थितींमध्ये स्थिर रहावे हीच संतांची शिकवण - हभप रामराव महाराज ढोक कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त किर्तनात प्रतिपादन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... आपल्या वाटेला आलेले भोग हे आपल्या ला भोगावेच लागतात. आपल्या तरुण मुलाचा आकस्मिक व अकालमृत्यू होणं ही कोणाही बापासाठी अत्यंत वेदनादायक व दु:खसागरात लोटणारीच बाब असते.मात्र जन्म-मरण हे अटळ आहे. त्यामुळे या दुःख अवेगातून सावरून सर्व परिस्थितींमध्ये स्थिर रहावे हीच संतांची शिकवण असल्याचे प्रतिपादन हभप रामराव महाराज ढोक यांनी लिंबोटा येथे कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित किर्तनात केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांचे चिरंजीव कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त लिंबोटा येथे रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे किर्तन झाले. याप्रसंगी फुलचंद राव कराड यांनी ह भ प रामराव महाराज ढोक यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. यावेळी 'आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनियां' या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर विवेचन करतांना ह.भ.प.रामराव