परळीची निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

 श्री संताजी महाराजांच्या नावाने नवीन सभागृह बांधून देणार धनंजय मुंडे यांचा तेली समाजाला शब्द


परळीची निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, शनी मंदिराच्या उर्वरित बांधकामाचेही काम मीच करणार - मुंडेंचा शब्द


परळी वैद्यनाथ (दि. 31) - परळी शहरांमध्ये विविध समाजातील लोक आनंदाने व एकोप्याने राहतात. विविध, सण उत्सव महापुरुषांची जयंती पुण्यतिथी यासारखे कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येक समाजाला स्वतःचे स्वतंत्र सभागृह देण्याचा मी आजवर प्रयत्न केला आहे. तेली समाजाला सुद्धा श्री संताजी महाराजांच्या नावाने सर्व सोयी युक्त असे सभागृह बांधून देणार असल्याचा शब्द धनंजय मुंडे यांनी तेली समाजाच्या सोबत आयोजित बैठकीमध्ये दिला आहे. 


परळीकरांना मागील निवडणुकीत दिलेले सर्वच्या सर्व शब्द पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यातून अनेक विकास कामे झाली आहेत तसेच अनेक विकास कामे प्रगतीपथावर असून काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे कुणी कितीही आरोप करून मला एकटे पाडण्याचा किंवा घेरण्याचा प्रयत्न केला तरी मी परळीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे, शनी मंदिराचे उर्वरित बांधकाम देखील मीच पूर्ण करणार आहे असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 


परळी शहरात तेली समाजाच्या प्रतिनिधी व नागरिकांच्या समवेत धनंजय मुंडे यांनी स्वतंत्र बैठकीद्वारे हा संवाद साधला. 


यावेळी दांडिया महोत्सव व इतर सामाजिक उपक्रम आयोजित करणाऱ्या तेली समाजातील तरुणांचे धनंजय मुंडे यांनी कौतुक केले. 


या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, संगमेश्वर फुटके, चंद्रकांत उदगीरकर, आयुब खान पठाण, सुरेश आण्णा टाक, चेतन सौंदळे, ॲड मंजीत सुगरे, कुमार व्यवहारे, दत्ताभाऊ सावंत, के डी उपाडे, प्रा. विनोद जगतकर, सूर्यकांत व्यवहारे, गुरुलिंग आप्पा पिंपळे, पांडुरंग अप्पा कोल्हे, शिवशंकर व्यवहारे, रामकीशन साखरे, तुळशीदास सालमोटे, डॉ.बावरे साहेब, पवन फुटके, प्रा.मधुकर शिंदे, अशोक बेंडे, छगन क्षीरसागर, मारुती अन्नपूर्णे, शंकर साखरे, राजाभाऊ शिंदे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !